महाड दुर्घटना - रत्नागिरीतील ३८ जण बेपत्ता
By admin | Published: August 4, 2016 12:52 PM2016-08-04T12:52:59+5:302016-08-04T12:52:59+5:30
महाडा येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३८ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - महाडा येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३८ जण बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.
बसमधील १८ प्रवासी, २ चालक, २ वाहक, तवेरातील आठ जण आणि खासगी वाहनाने जाणारे अन्य आठ जण असे ३८ जण बेपत्ता असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास हा पूल कोसळला तेव्हा पूलावर असणा-या दोन एसटी बससह काही वाहने नदीपात्रात कोसळून वाहून गेली.