महाड दुर्घटना - चार मृतदेह सापडले, शोधकार्यात अडथळे कायम

By admin | Published: August 4, 2016 09:15 AM2016-08-04T09:15:00+5:302016-08-04T14:14:57+5:30

महाड दुर्घटनेतील एसटी चालक एस.एस.कांबळेंचा मृतदेह दापोलीतील आंर्जेले येथील समुद्र किना-यावर सापडला आहे.

Mahad accident - found four bodies, found obstacles in the search | महाड दुर्घटना - चार मृतदेह सापडले, शोधकार्यात अडथळे कायम

महाड दुर्घटना - चार मृतदेह सापडले, शोधकार्यात अडथळे कायम

Next

ऑनलाइन लोकमत 

आंर्जेल, दि. ४ -  सावित्री नदीपात्रात सुरु असलेल्या शोध कार्याला आता ३६ पेक्षा जास्त उलटले आहेत. मात्र एसटी किंवा अन्य वाहनांचे कुठलेही अवशेष सापडलेले नाहीत. सकाळपासून फक्त चार मृतदेह सापडले आहेत. दोन मृतदेह शेकडो किमी दूर समुद्र किना-यावर तर दोन मृतदेह महाडमध्ये सापडले आहेत. 
 
पहिला मृतदेह दापोलीतील आंर्जेले किना-यावर सापडला. तो एसटी चालक एसएस कांबळे यांचा मृतदेह होता. दुसरा वृद्ध महिलेचा मृतदेह हरीहरेश्वरच्या किना-यावर सापडला. तिसरा मृतदेह महाड जवळच्या केंबुर्ली गावात तर, चौथा मृतदेह महाडमध्येच दादली पूलाजवळ सापडला. 
 
या दरम्यान नदीतील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे शोधकार्यात गुंतलेली एनडीआरएफची बोटही उलटली. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली. मुसळधार पाऊस कायम असल्यामुळे नदीच्या प्रवाहाला वेग असून त्यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.
 
महाड दुर्घटनेतील एसटी चालक एस.एस.कांबळेंचा मृतदेह दापोलीतील आंर्जेले येथील समुद्र किना-यावर सापडला आहे. दुर्घटनास्थळापासून  ७० किमी अंतरावर हा मृतदेह सापडला. मृतदेहावर ८२३४ बॅच नंबर आहे. 
 
एस.एस.कांबळे जयगड-मुंबई एसटीबसचे चालक होते. महाड दुर्घटनेतील सापडलेला हा तिसरा मृतदेह आहे. यापूर्वी काल दोन मृतदेह सापडले होते. 
 
आणखी वाचा 
 
सावित्र नदीवरील जुना ब्रिटीशकालीन पूल कोसळल्यानंतर दोन एसटी बससह वाहून गेलेल्या वाहनांपैकी एकही वाहन अद्यापपर्यंत सापडलेले नाही. 

Web Title: Mahad accident - found four bodies, found obstacles in the search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.