भाजपाचे बम भोले!... देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा उद्या महादेवाचरणी, दिल्लीहून आलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 01:59 PM2022-10-10T13:59:02+5:302022-10-10T14:07:23+5:30
संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकाल लोक इथं आगमन होईल. या कार्यक्रमाचं सर्व चॅनेलवर लाईव्ह प्रसारण केले जाईल.
मुंबई - मध्य प्रदेशच्या उज्जैन इथं 'महाकाल लोक' मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ ऑक्टोबरला होणार आहे. भोपाळपासून २०० किमी अंतरावर ८५६ कोटी रुपये खर्च करून महाकालेश्वर मंदिर कॉरिडोर विकास प्रकल्पाचं पहिल्या टप्प्याचं उद्धाटन यावेळी होणार आहे. अयोध्येतील प्रभू राम मंदिरानंतर महाकाल मंदिराच्या उद्धाटनप्रसंगी भाजपानं देशभरात कार्यक्रम आयोजित केला आहे.
संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकाल लोक इथं आगमन होईल. या कार्यक्रमाचं सर्व चॅनेलवर लाईव्ह प्रसारण केले जाईल. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ज्योर्तिलिंग परिसरात पूजेचं आयोजन केले जाईल. भाजपा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सर्व मोठ्या शिव मंदिरात पूजा करत महाकाल लोक मंदिराचं उद्धाटन लोकांना पाहता यावं यासाठी स्क्रीन लावून जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घ्यावं अशा सूचना दिल्लीहून आलेल्या पत्रात देण्यात आल्या आहेत.
विहंगम दृश्य!
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) October 9, 2022
सतत् साधना, पूरा मनोयोग, असीम धैर्य, अटल दृढ़संकल्प, अपरिमेय ऊर्जा और अपराजेय जज्बे के परिणामस्वरूप आज उज्जयिनी विलक्षण वैभव से सराबोर है।
इस अद्भुत #ShriMahakalLok को देखकर सनातन धर्म में हमारी आस्था और अधिक प्रबल होगी।
।। जय महाकाल ।। pic.twitter.com/3j9SvY5jgb
या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री भुलेश्वर महादेव मंदिरात पूजा करणार आहेत तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे विलेपार्ले इथल्या मंदिरात महादेवाची पूजा करतील. तसेच ठिकठिकाणी जिल्हाध्यक्ष प्रमुख मंदिर-मठात स्क्रीन लावून थेट लाईव्ह प्रसारण लोकांसाठी उपलब्ध करून देतील. या कार्यक्रमासाठी धर्माचार्य, साधुसंत, विशेष अतिथी यांना आमंत्रण देऊन त्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्या असंही कळवण्यात आले आहे. यात पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यक्रमात हजर राहतील असंही सांगण्यात आले आहे. अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळीही भाजपाने अशाप्रकारे कार्यक्रम हाती घेत देशभरात जल्लोष साजरा केला होता.
भगवान महाकाल की कृपा से #ShriMahakalLok के निर्माण का कार्य पूर्ण हुआ है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) October 9, 2022
अद्भुत आनंद का विषय यह है कि स्वयं प्रधानमंत्री श्री @narendramodi जी श्री महाकाल लोक का लोकार्पण करने उज्जैन पधार रहे हैं।
चारों ओर उत्सव, उल्लास व प्रसन्नता है.. https://t.co/MVa3LIkUH4pic.twitter.com/grOyoB3PRi