मेट्रो उभारणीसाठी आता ‘महामेट्रो’

By Admin | Published: October 22, 2016 11:42 PM2016-10-22T23:42:46+5:302016-10-22T23:42:46+5:30

समान विकास धोरणांतर्गत राज्यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीसाठी आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) या कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे.

'Mahamatro' for the construction of the Metro | मेट्रो उभारणीसाठी आता ‘महामेट्रो’

मेट्रो उभारणीसाठी आता ‘महामेट्रो’

googlenewsNext

- मोरेश्वर मानापुरे, नागपूर
समान विकास धोरणांतर्गत राज्यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीसाठी आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) या कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. सर्व प्रकल्पांच्या उभारणीमध्ये वेळ आणि खर्चात बचत करण्यावर जादा भर देण्यात येणार आहे.
पुणे मेट्रो रेल्वेच्या उभारणीचे काम सध्या तरी नागपूर मेट्रो रेल्वे कंपनीला दिलेले नाही. ते ‘महामेट्रो’ अंतर्गत पूर्ण होणार असल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. म्हणजेच भविष्यात नागपूर आणि पुणे ‘महामेट्रो’चा हिस्सा राहणार आहे. पुणे मेट्रोची नव्याने उभारणी आणि साधनसामग्रीवर एकूण १३ टक्के अतिरिक्त खर्चाचा भार येणार आहे, पण ‘महामेट्रो’मुळे एवढीच आर्थिक बचत होणार असल्याने तिकिटांचे दर कमी राहतील आणि त्याचा प्रवाशांना फायदाच होईल.

चार आठवड्यांत
कंपनीची स्थापना
साधारणपणे ३ ते ४ आठवड्यांत केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतरच कंपनीची स्थापना होणार आहे. त्यानंतर, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ‘महामेट्रो’मध्ये परिवर्तित होईल.

Web Title: 'Mahamatro' for the construction of the Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.