महामार्गालगत बंदी़ ग़ल्लीत महापूर
By admin | Published: April 17, 2017 02:32 AM2017-04-17T02:32:32+5:302017-04-17T02:32:32+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेले हॉटेल, बिअरबार आणि वाईन शॉप बंद झाल्यानंतर जिल्ह्यात
अरूण वाघमोडे, अहमदनगर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेले हॉटेल, बिअरबार आणि वाईन शॉप बंद झाल्यानंतर जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचा महापूर आला असून, गल्लोगल्ली आता सहज दारू उपलब्ध होत आहे़
गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात जवळपास १ कोटी रूपयांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले. १८५ आरोपींना अटक करत २२६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिले़ प्रत्यक्षात मात्र अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे. जिल्ह्यातील परवाना असलेले ८२५ पैकी ७०० हॉटेल, बिअरबार व मद्यविक्री दुकाने बंद झाले़ त्यामध्ये नगर शहरातील ७३ हॉटेल आणि वाईनशॉप बंद झाले़ हायवेवरील मद्यबंदीचा अवैध दारू बनविणारे आणि विक्रेत्यांची चांगलाच फायदा उठविला आहे़ चोरट्या मार्गाने जिल्ह्यात दररोज कोट्यवधी
रूपयांच्या मद्याची आयात केली जात आहे़
परवानाधारक वाईनशॉपमधूनही मद्य खरेदी करून ते जास्त किमतीने विकले जात आहे़ त्यातच हातभट्टी आणि बनावट दारू तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे़