डोंबिवलीत साकारली स्वातंत्र्यवीर सावरकरांची महारांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2017 08:56 AM2017-03-28T08:56:44+5:302017-03-28T08:57:48+5:30

डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानात साकारण्यात आलेल्या महारांगोळीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 51व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनातील विविध घटना चित्रित करण्यात आल्या आहेत.

Maharabali of Swatantryaveer Savarkar in Dombivli | डोंबिवलीत साकारली स्वातंत्र्यवीर सावरकरांची महारांगोळी

डोंबिवलीत साकारली स्वातंत्र्यवीर सावरकरांची महारांगोळी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

डोंबिवली, दि. 28 -  गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानात महारांगोळी साकारण्यात आली आहे.  
 
शिवाय, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त या महारांगोळीत त्यांच्याही जीवनातील विविध घटना चित्रित करण्यात आल्या आहेत. २५ महिला आणि २० पुरुष कलाकारांनी मिळून २८ तासांमध्ये ही रांगोळी साकारली. गणेश मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही रांगोळी नागरिकांना पाहता येणार आहे.
(साहसी प्रात्यक्षिके, आतषबाजीने फेडले पारणे)
 
याशिवाय, श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष संयोजन समितीतर्फे संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त सोमवारी भागशाळा मैदानात अनादिरव पथकाने शारीरिक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. गणेश मंदिर पथकानेही शारीरिक कवायती सादर केल्या. या वेळी ढोलवादनाचा नाद भागशाळा मैदानात निनादला. 
(मराठमोळा गुढीपाडवा)
राष्ट्रसेविका समितीची तलवारबाजीची प्रात्यक्षिके पाहून सगळेच थक्क झाले. दुसरीकडे भागशाळा व पाटकर मैदानांवर रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्रीपासूनच घनश्याम गुप्ते, रेल्वे स्थानक, द्वारका हॉटेल, आई बंगला, चार रस्ता, शिवाजी महाराज पुतळ्यानजीक भव्य रांगोळ्या काढण्यास सुरुवात झाली. ‘संस्कारभारती’ने स्वागतयात्रा मार्गावर पायघड्या घातल्या.
(गुढी उभारु आनंदाची!)
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Web Title: Maharabali of Swatantryaveer Savarkar in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.