Maharashtra: 5,460 जोडप्यांना मिळणार 27 कोटी

By नितीन चौधरी | Published: June 30, 2023 09:46 AM2023-06-30T09:46:52+5:302023-06-30T09:47:28+5:30

Marriage: समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसाहाय्य देण्यात येते.

Maharashtra: 27 crores will be given to 5,460 couples | Maharashtra: 5,460 जोडप्यांना मिळणार 27 कोटी

Maharashtra: 5,460 जोडप्यांना मिळणार 27 कोटी

googlenewsNext

- नितीन चौधरी / समीर देशपांडे 
पुणे/कोल्हापूर : समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसाहाय्य देण्यात येते. त्यानुसार या आर्थिक वर्षात राज्यासाठी २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सुमारे साडेपाच हजार जोडप्यांना आर्थिक फायदा होणार आहे. 

कुणाला मिळते रक्कम? 
n ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य या योजनेंतर्गत प्रत्येक दाम्पत्याला देण्यात येते. ही रक्कम पती-पत्नी यांच्या संयुक्त नावाने देण्यात येते. 
n मंजूर झालेला निधी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना उपलब्ध करून दिला आहे.

कोणासाठी ही योजना? 
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शीख या प्रवर्गात असणे आवश्यक आहे.

विभागनिहाय मिळालेला निधी
जूनमध्ये एकूण मंजूर निधी 
₹२७,३१,७६,०००
मुंबई    ₹४.३९ कोटी
पुणे    ₹५.३३ कोटी
नाशिक     ₹५.७९ कोटी
अमरावती    ₹३.८६ कोटी
नागपूर    ₹६.५२ कोटी 
औरंगाबाद    ₹६४.५ लाख 
लातूर    ₹७६.८ लाख

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांच्या संसाराला हातभार लागावा, या उद्देशाने अनुदान मंजूर करण्यात येते. हा निधी या दाम्पत्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.  - डॉ. प्रशांत नारनवरे,  आयुक्त, समाज कल्याण

छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वांत कमी प्रस्ताव
सर्वाधिक म्हणजे २,७२३ आंतरजातीय विवाह अनुदान प्रस्ताव नागपूर विभागातून आले आहेत. तर सर्वांत कमी म्हणजे २७१ छत्रपती संभाजीनगर विभागातून आले आहेत. सर्वांत जास्त म्हणजे १,१७२ प्रस्ताव जळगाव जिल्ह्यातून तर सर्वांत कमी म्हणजे २० प्रस्ताव जालना जिल्ह्यातील आहेत.

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांची संख्या
जळगाव    १,१७२
पुणे    ७९५
नागपूर    ७७०
अमरावती    ६९०
नाशिक    ६०२
चंद्रपूर    ६००
भंडारा    ४५३
मुंबई उपनगर    ४५३
रायगड    ४२२
सातारा    ४१८
गोंदिया    ४०६
कोल्हापूर    ४००
सोलापूर    ३५५
यवतमाळ    ३५३
ठाणे    ३०६
अकोला    २९२
गडचिरोली    २७८
सांगली    २६०
पालघर    २४३
वर्धा    २१६
बुलढाणा    २००
मुंबई शहर    १८५
धुळे    १३८
रत्नागिरी    ९५
सिंधुदुर्ग    ८१
नंदुरबार    ७८
वाशिम    ७४
लातूर    ७२
धाराशिव    ७०
बीड    ६९
हिंगोली    ३९
परभणी    २२
जालना    २०

Web Title: Maharashtra: 27 crores will be given to 5,460 couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.