वरळीकरांनो, आदित्य ठाकरेंंना पाडाचं; विरोधकांचा नव्हे भाजपच्या आयटी सेलचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 02:25 PM2019-10-06T14:25:42+5:302019-10-06T14:38:56+5:30

शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी या दोन्ही पक्षात मतभेद कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले

maharashtra assembly election 2019 Aditya Thackeray criticizes From BJP's IT Cell | वरळीकरांनो, आदित्य ठाकरेंंना पाडाचं; विरोधकांचा नव्हे भाजपच्या आयटी सेलचे आवाहन

वरळीकरांनो, आदित्य ठाकरेंंना पाडाचं; विरोधकांचा नव्हे भाजपच्या आयटी सेलचे आवाहन

googlenewsNext

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांची युती झाली असली, तरीही या पक्षाच्या आयटी सेलची अजूनही युती झालीन नसल्याचे दिसून येत आहे. कारण भाजपच्या आयटी सेलकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका केली जात असल्याच्या पोस्ट पाहायला मिळत आहे. तर विधानसभा निवडणुकीत आदित्य यांना मतदान न करण्याचे आवाहन सुद्धा भाजपच्या आयटी सेलकडून केले जात आहे.

'पुन्हा नरेंद्र पुनः देवेंद्र मिशन 2019' या फेसबुक पेजवरून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षावर व त्यांच्या नेत्यांविरोधात पोस्ट करण्यात येतात. मात्र आता चक्क भाजपसोबत युती करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांवर सुद्धा या पेजवरून टीका केली जात आहे. रोज किड्यामुंग्यांसारखा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची स्थिती बदलेल अशा मेट्रो 3 प्रकल्पाला आदित्यांचा विरोध आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना त्यांची जागा दाखवाच असे आवाहन या पेजवरून करण्यात आले आहे.

वरळीकरांनो, आदित्य ठाकरे हे यंदा तुमच्या क्षेत्रातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मुंबईकरांची काळजी नसलेल्या आदित्य ठाकरेंना येत्या निवडणुकीत मतदान न करता सणसणीत उत्तर द्या, अशी पोस्ट भाजपच्या आयटी सेलकडून पोस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी या दोन्ही पक्षात मतभेद कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे यासर्व पोस्ट युतीच्या घोषणेनंतर टाकण्यात आल्या आहेत. गेल्या 23 तासात आरेच्या मुद्यावरून या पेजवर आदित्य ठाकरेंच्या विरोधात एकूण पाच वेगवेगळ्या पोस्ट शेयर करण्यात आल्या आहे. त्यामुळे एकीकडे युती करायची आणि दुसऱ्याकडे शिवसेनेवर टीका करायची, भाजपच्या या भुमिकेमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर नाराजी पाहायला मिळत आहे.

Web Title: maharashtra assembly election 2019 Aditya Thackeray criticizes From BJP's IT Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.