'त्या' फेसबुक पोस्टमुळे घाटकोपरमध्ये गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 12:44 PM2019-10-11T12:44:05+5:302019-10-11T13:03:13+5:30

मनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

maharashtra assembly election 2019 Confusion in Ghatkopar with Facebook post | 'त्या' फेसबुक पोस्टमुळे घाटकोपरमध्ये गोंधळ

'त्या' फेसबुक पोस्टमुळे घाटकोपरमध्ये गोंधळ

googlenewsNext

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर चढत आहे. त्यामुळे विरोधीपक्षासह मित्रपक्षांच्या हालचालीवर उमेदवाराकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. तर सोशल मीडियावर काय सुरू आहे, याचीही दखल घेण्यात येते. अनेकदा काही पोस्टमुळे गोंधळ निर्माण होतो. असंच काहीस घाटकोपरमध्ये घडले. त्यामुळे भाजप उमेदवार राम कदम यांनी लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरमधीलमनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी काही शिवसैनिकही उपस्थित होते. मात्र चुक्कल यांनी पुष्पहार अर्पण करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच 'ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है' असं कॅप्शन लिहण्यात आले होते.

यावरून मतदार संघात एकच गोंधळ झाला. तसेच सोशल मीडियावर या संदर्भातील पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तातडीने शिवसेना पदाधिकाऱ्यांना प्रतिक्रिया द्यावी लागली. तर भाजपकडून देखील याची दखल घेण्यात आली. घाटकोपरमधून राम कदम भाजपचे उमेदवार आहे. राम कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका शिवसैनिकांनी साहेब माफ करा, पण आमचं मत मनसेला अशी बॅनरबाजी केली होती. त्यावरून मतदार संघात संभ्रमाचे वातावरण होते. त्यात आता हा गोंधळ झाल्यामुळे राम कदम यांची चिंता वाढली आहे.

या घटनेनंतर राम कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेतली. तसेच शिवसेना भाजपसोबत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तर शिवसैनिकांकडून गणेश चुक्कर यांच्याविरुद्द तक्रार करण्यात आली. त्यानंतर संबंधीत फेसबूक पोस्ट डिलीट करण्यात आली. तर शाखाप्रमुखांच्या परवानगीनंतरच आम्ही शिवसेना कार्यालयात गेलो होतो. शिवराया आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात गैर काय, असा सवाल चुक्कल यांनी उपस्थित केला.

 

Web Title: maharashtra assembly election 2019 Confusion in Ghatkopar with Facebook post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.