२०१९ पेक्षा यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ; कोणत्या मतदारसंघात सर्वोधिक मतदान?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 08:45 AM2024-11-21T08:45:37+5:302024-11-21T08:46:16+5:30

महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यातील २८८ मतदारसंघात ६५.०२ टक्के सरासरी मतदान झालं आहे

Maharashtra Assembly Election 2024 - 65.02 percent average voter turnout in 288 constituencies in 36 districts of Maharashtra | २०१९ पेक्षा यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ; कोणत्या मतदारसंघात सर्वोधिक मतदान?

२०१९ पेक्षा यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ; कोणत्या मतदारसंघात सर्वोधिक मतदान?

मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पाडले. या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीसह इतर पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. येत्या २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल त्यानंतर राज्यात कुणाचे सरकार येईल हे कळेल. परंतु २०१९ निवडणुकीच्या तुलनेने यंदा महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मतदानाच्या दिवशी रात्री ११.३० पर्यंत महाराष्ट्रात ६५.०२ टक्के मतदान झाले आहे. अजूनही फायनल टक्केवारी बाकी असल्याने हा आकडा आणखी वाढू शकतो. 

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे

  1. अहिल्यानगर - १२ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ७१.७३ टक्के मतदान
  2. अकोला - ५ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६४.९८ टक्के मतदान
  3. अमरावती - ८ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६५.५७ टक्के मतदान
  4. छत्रपती संभाजीनगर - ९ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६८.८९ टक्के मतदान 
  5. बीड - ६ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६६.४१ टक्के मतदान
  6. भंडारा - ३ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६९.४२ टक्के मतदान
  7. बुलढाणा - ७ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ७०.३२ टक्के मतदान
  8. चंद्रपूर - ६ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ७१.२७ टक्के मतदान
  9. धुळे - ५ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६४.७० टक्के मतदान 
  10. गडचिरोली - ३ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ७३.६८ टक्के मतदान
  11. गोंदिया - ४ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६९.५३ टक्के मतदान
  12. हिंगोली - ३ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ७१.१० टक्के मतदान
  13. जळगाव - ११ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६४.४२ टक्के मतदान
  14. जालना - ५ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ७२.३० टक्के मतदान
  15. कोल्हापूर - १० विधानसभा मतदारसंघ - सरासरी ७६.२५ टक्के मतदान
  16. लातूर - ६ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६६.९२ टक्के मतदान
  17. मुंबई शहर - १० विधानसभा मतदारसंघ - सरासरी ५२.०७ टक्के मतदान
  18. मुंबई उपनगर - २६ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ५५.७७ टक्के मतदान
  19. नागपूर - १२ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६०.४९ टक्के मतदान
  20. नांदेड - ९ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६४.९२ टक्के मतदान
  21. नंदूरबार - ४ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६९.१५ टक्के मतदान
  22. नाशिक - १५ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६७.५७ टक्के मतदान
  23. धाराशिव - ४ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६४.२७ टक्के मतदान
  24. पालघर - ६ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६५.९५ टक्के मतदान
  25. परभणी - ४ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ७०.३८ टक्के मतदान
  26. पुणे - २१ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६०.७० टक्के मतदान
  27. रायगड - ७ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६५.९७ टक्के मतदान
  28. रत्नागिरी - ५ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६४.६५ टक्के मतदान
  29. सांगली - ८ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ७१.८९ टक्के मतदान
  30. सातारा - ८ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ७१.७१ टक्के मतदान
  31. सिंधुदुर्ग - ३ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६८.४० टक्के मतदान
  32. सोलापूर - ११ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६७.३६ टक्के मतदान
  33. ठाणे - १८ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ५६.०५ टक्के मतदान
  34. वर्धा - ४ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६८.३० टक्के मतदान
  35. वाशिम - ३ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६६.०१ टक्के मतदान
  36. यवतमाळ - ७ विधानसभा मतदारसंघ - सरासरी ६९.०२ टक्के मतदान

 

महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यातील २८८ मतदारसंघात ६५.०२ टक्के सरासरी मतदान झालं आहे. त्यात ८ मतदारसंघात ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले असून त्यात गडचिरोली, कोल्हापूर, परभणी, सातारा, सांगली, जालना, बुलढाणा, अहिल्यानगर, हिंगोली या मतदारसंघाचा समावेश आहे. तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे भागात कमी मतदान झाले आहे.  

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - 65.02 percent average voter turnout in 288 constituencies in 36 districts of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.