राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:59 AM2024-10-30T05:59:13+5:302024-10-30T07:17:04+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : अखेरच्या दिवशी मंत्रालयातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Maharashtra Assembly Election 2024 : As many as 7,995 candidates in the state, rebels in all parties are also responsible, 10,905 nominations filed | राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल

राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची आणि पक्षांची चांगलीच धांदल उढाली असून, राज्यात अखेरच्या एका दिवसात ४ हजार ९९६ उमेदवारांचे एकूण ६ हजार ४८४ अर्ज दाखल झाले. त्यामुळे आता राज्यातील २८८ मतदारसंघांत एकूण ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातही सर्वच पक्षांमध्ये बंडखोरही भारंभार झाले आहेत. 

अखेरच्या दिवशी मंत्रालयातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्यासह निवडणूक कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग देखील उशीर पर्यंत कार्यालयात उपस्थित होता. आता उमेदवारी अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी होणार असून ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येतील.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर महायुतीच्या बाजूने तीन आणि महाविकास आघाडीच्या बाजूने तीन पक्ष असे राज्यात सहा राजकीय पक्ष तयार झाले. यावेळी महायुतीकडून तीन आणि मविआकडून तीन असे सहा पक्ष निवडणूक रिंगणात असल्याने या पक्षांकडून तिकिटासाठी इच्छुक असलेल्यांची संख्याही जास्त होती. त्यात युती-आघाडीमुळे वाट्याला आलेले मतदारसंघ कमी आणि इच्छुक जास्त यात ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही त्यातील अनेकांनी बंडखोरी केल्याने यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांचे पेव फुटले आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत स्पष्ट झालेल्या बंडखोरीच्या चित्रावरून काही ठिकाणी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने विद्यमान आमदारही बंडखोरी करून रिंगणात उतरले आहेत. 

कोणी केली बंडखोरी?
जेथे भाजपचा उमेदवार, तेथे... 

विक्रमगड    प्रकाश निकम (शिंदेसेना)
चिंचवड     नाना काटे, भाऊसाहेब भोईर 
    (अजित पवार गट)
सांगली     शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे (भाजप)
जत     तम्मनगौडा रवी पाटील (भाजप)
शिराळा     बंडखोर - सम्राट महाडिक (भाजप)
दौंड     वीरधवल जगदाळे (अजित पवार गट)
साेलापूर शहर उत्तर     शाेभा बनशेट्टी, संजय साळुंखे, 
    अमर बिराजदार (भाजप), 
    अमाेल शिंदे (शिंदेसेना)
साेलापूर शहर मध्य    श्रीनिवास संगा (भाजप), 
    मनीष काळजे (शिंदेसेना)
साेलापूर दक्षिण    श्रीशैल हत्तुरे (भाजप), 
    मेनका राठाेड (भाजप)
जेथे शिंदेसेनेचा उमेदवार, तेथे...  
सावंतवाडी     विशाल परब (भाजप)
अलिबाग     दिलीप भोईर (भाजप)
खानापूर आटपाडी     ब्रम्हानंद पडळकर (भाजप)
जेथे अजित पवार गटाचा उमेदवार, तेथे...  
पिंपरी     बाळासाहेब ओव्हाळ (भाजप),
    चंद्रकांता सोनकांबळे (आरपीआय)
मावळ     बापू भेगडे (अजित पवार गट)
भोर     किरण दगडे पाटील (भाजप)
जुन्नर    शरद सोनावणे (शिंदेसेना)
शिरूर     प्रदीप कंद (भाजप)
माढा     रणजितसिंह शिंदे (अजित पवार गट)

जेथे उद्धवसेनेचा उमेदवार, तेथे... 
मतदारसंघ    बंडखोर उमेदवार
राजापूर     अविनाश लाड (कॉंग्रेस)
रत्नागिरी     उदय बने (उद्धवसेना
सावंतवाडी     अर्चना घारे परब (शरद पवार गट)
मिरज     मोहन व्हनखंडे (काँग्रेस)
साेलापूर दक्षिण     दिलीप माने, बाबा मिस्त्री (काॅंग्रेस), धर्मराज काडादी (शरद पवार गट)
जेथे काँग्रेसचा उमेदवार, तेथे... 
वसई     विनायक निकम (उद्धवसेना)
शिवाजीनगर     मनीष आनंद (काँग्रेस)
कसबा     कमल व्यवहारे (काँग्रेस)
सांगली     जयश्रीताई पाटील (मविआ-काँग्रेस)
साेलापूर शहर मध्य     अंबादास करगुळे, शाैकत पठाण 
    (काॅंग्रेस), ताैफीख शेख (श. पवार गट)
पंढरपूर     अनिल सावंत, वसंतराव देशमुख
    (शरद पवार गट)
जेथे शरद पवार गटाचा उमेदवार, तेथे... 
खानापूर आटपाडी     राजेंद्रअण्णा देशमुख 
    (शरद पवार गट)
साेलापूर शहर उत्तर     सुनील रसाळे (काॅंग्रेस)
माेहाेळ    नागनाथ क्षीरसागर, संजय क्षीरसागर,
    रमेश कदम (शरद पवार गट)
माढा     शिवाजी कांबळे (शरद पवार गट)
पिंपरी     गौतम चाबुकस्वार, 
    सचिन भोसले (उद्धवसेना)
भोसरी     रवी लांडगे (उद्धवसेना)
पर्वती     आबा बागुल (काँग्रेस)
आंबेगाव     राजू इनामदार (काँग्रेस)
इंदापूर     प्रवीण माने (शरद पवार गट)

विमानाने आणले एबी फॉर्म
नाशिक : मंगळवारी शिंदेसेनेने कमाल करीत नाशिक जिल्ह्यातील दोन एबी फॉर्मसाठी खास विमान पाठवले आणि घाईघाईने यातील एक फॉर्म ओझर विमानतळावरच धनराज महाले यांनी दिला, तर दुसरा फॉर्म देण्यासाठी अत्यंत धावपळीत पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी नाशिक शहरातील भरतनगर येथे पोहोचले आणि उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या दोन ते तीन मिनिटे अगोदर राजश्री अहिरराव यांच्या उमेदवारी अर्जाला एबी 
फॉर्म जोडला. त्यानंतर भाऊसाहेब चौधरी त्याच विमानाने मुंबईला रवाना झाले.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : As many as 7,995 candidates in the state, rebels in all parties are also responsible, 10,905 nominations filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.