गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 04:12 PM2024-10-20T16:12:39+5:302024-10-20T16:14:59+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Maharashtra assembly election 2024 BJP has given ticket to Sulabha Gaikwad, wife of MLA Ganpat Gaikwad from Kalyan East  | गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?

गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?

भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ९९ उमेदवारांची घोषणा केली. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचा इशारा महेश गायकवाड यांनी दिला होता. आमदार गायकवाड आणि शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवा नाही. द्वारली येथील एका जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात शहर प्रमुख गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना फेब्रुवारी २०२४ मध्ये घडली. या गोळीबार प्रकरणी आमदार गायकवाड सध्या तळोजा कारागृहात आहेत. आमदार गायकवाड यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे भाजपने आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीला विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. त्यांना भाजपने विधानसभा प्रमुखपद दिले. आमदार गायकवाड यांच्या अनुपस्थितीत सुलभा गायकवाड यांनी विकास कामांची भूमिपूजने केली. तसेच पक्षाच्या बैठका, विविध कार्यक्रमांसह शहरातील अन्य कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यामुळे भाजपकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती ज्यावर आज शिक्कामोर्तब झाला. याच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आमदार गायकवाड यांच्या विरोधात दंड थोपटताना तिखट प्रतिक्रिया दिली. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदेंचे विश्वासू मानले जाणारे महेश गायकवाड अपक्ष लढणार का याची चर्चा रंगली आहे.

आमदार गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदार संघातून गेली १५ वर्षे आमदार आहेत. त्यांनी गेल्या १५ वर्षात विकास कामे केली नाहीत. शहरात पाणी समस्या, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहतूक कोंडीची समस्या, शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा आमदार गायकवाड यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे शहर प्रमुख गायकवाड यांनी सांगितले होते. 

भाजपची यादी -

  1. नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
  2. कामठी - चंद्रशेखर बावनकुळे
  3. शहादा - राजेश पाडवी
  4. नंदूरबार- विजयकुमार गावीत
  5. धुळे शहर - अनुप अग्रवाल
  6. सिंदखेडा - जयकुमार रावल
  7. शिरपूर - काशीराम पावरा
  8. रावेर - अमोल जावले
  9. भुसावळ - संजय सावकारे 
  10. जळगाव शहर - सुरेश भोळे 
  11. चाळीसगाव - मंगेश चव्हाण 
  12. जामनेर - गिरीश महाजन 
  13. चिखली - श्वेता महाले 
  14. खामगाव - आकाश फुंडकर 
  15. जळगाव (जामोद) - संजय कुटे 
  16. अकोला पूर्व - रणधीर सावरकर
  17. धामगाव रेल्वे - प्रताप अडसद 
  18. अचलपूर - प्रवीण तायडे 
  19. देवली - राजेश बकाने 
  20. हिंगणघाट - समीर कुणावार 
  21. वर्धा - पंकज भोयर 
  22. हिंगना - समीर मेघे 
  23. नागपूर दक्षिण - मोहन माते 
  24. नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
  25. तिरोरा - विजय रहांगडाले 
  26. गोंदिया - विनोद अग्रवाल 
  27. अमगांव - संजय पुरम
  28. आर्मोली - कृष्णा गजबे 
  29. बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार 
  30. चिमूर - बंटी भांगडिया 
  31. वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार 
  32. रालेगाव - अशोक उडके 
  33. यवतमाळ - मदन येरवर 
  34. किनवट - भीमराव केरम 
  35. भोकर - क्षीजया चव्हाण 
  36. नायगाव - राजेश पवार 
  37. मुखेड - तुषार राठोड 
  38. हिंगोली - तानाजी मुटकुले 
  39. जिंतूर - मेघना बोर्डीकर 
  40. परतूर - बबनराव लोणीकर
  41. बदनापूर - नारायण कुचे 
  42. भोकरदन - संतोष दानवे 
  43. फुलंब्री - अनुराधा चव्हाण
  44. औरंगाबाद पूर्व - अतुल सावे 
  45. गंगापूर - प्रशांत बंब 
  46. बगलान - दिलीप बोरसे 
  47. चंदवड - राहुल अहेर
  48. नाशिक पूर्व - राहुल ढिकाले 
  49. नाशिक पश्चिम - सीमाताई हिरे 
  50. नालासोपारा - राजन नाईक 
  51. भिवंडी पश्चिम - महेश चौघुले 
  52. मुरबाड - किसन कथोरे 
  53. कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड 
  54. डोंबिवली - रवींद्र चव्हाण 
  55. ठाणे - संजय केळकर 
  56. ऐरोली - गणेश नाईक
  57. बेलापूर - मंदा म्हात्रे 
  58. दहिसर - मनीषा चौधरी 
  59. मुलुंड - मिहिर कोटेचा 
  60. कांदिवली पूर्व - अतुल भातखलकर 
  61. चारकोप - योगेश सागर 
  62. मालाड पश्चिम - विनोद शेलार
  63. गोरेगाव - विद्या ठाकूर
  64. अंधेरी पश्चिम - अमित साटम 
  65. विलेपार्ले - पराग अलवणी 
  66. घाटकोपर पश्चिम - राम कदम 
  67. वांद्रे पश्चिम - आशिष शेलार 
  68. सायन कोळीवाडा - तमिल सेल्वन 
  69. वडाळा - कालिदास कोळंबकर 
  70. मलबार हिल - मंगलप्रभात लोढा 
  71. कुलाबा - राहुल नार्वेकर 
  72. पनवेल - प्रशांत ठाकूर 
  73. उरन - महेश बाल्दी 
  74. दौंड- राहुल कुल 
  75. चिंचवड - शंकर जगताप 
  76. भोसली -महेश लांडगे 
  77. शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले 
  78. कोथरुड - चंद्रकांत पाटील 
  79. पर्वती - माधुरी मिसाळ 
  80. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील 
  81. शेवगाव - मोनिका राजले 
  82. राहुरी - शिवाजीराव कर्डिले 
  83. श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते 
  84. कर्जत जामखेड - राम शिंदे 
  85. केज - नमिता मुंदडा 
  86. निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर 
  87. औसा - अभिमन्यू पवार 
  88. तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील 
  89. सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
  90. अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी 
  91. सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख 
  92. माण - जयकुमार गोरे 
  93. कराड दक्षिण - अतुल भोसले 
  94. सातारा - शिवेंद्रसिंहराजे भोसले 
  95. कणकवली - नितेश राणे 
  96. कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक 
  97. इचलकरंजी - राहुल आवाडे 
  98. मिरज - सुरेश खाडे 
  99. सांगली - सुधीर गाडगीळ 

Web Title: Maharashtra assembly election 2024 BJP has given ticket to Sulabha Gaikwad, wife of MLA Ganpat Gaikwad from Kalyan East 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.