"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 07:06 AM2024-11-09T07:06:34+5:302024-11-09T07:08:27+5:30

Maharashtra Assembly Election 2024: एससी, एसटी आणि ओबीसी या जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस देशात आणि राज्यात खेळत आहे. हा समाज एकत्र आला तर आपले राजकीय दुकान बंद होईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

Maharashtra Assembly Election 2024: "Dangerous game of caste-fighting by Congress, hence 'Ek Hai Toh Seif Hai'", slams Narendra Modi | "काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात

"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात

धुळे/नाशिक - एससी, एसटी आणि ओबीसी या जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस देशात आणि राज्यात खेळत आहे. हा समाज एकत्र आला तर आपले राजकीय दुकान बंद होईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे, असा घणाघाती आरोप करीत 'एक है तो सेफ है', असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचार शुभारंभप्रसंगी दिला. महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाके आहेत, ना ब्रेक आणि गाडीचा ड्रायव्हर बनण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. 

महायुतीच्या धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी दोन सभा घेतल्या. धुळ्याच्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल आदींसह उमेदवार उपस्थित होते. काँग्रेसने नेहमी दहशतवादाला संरक्षण दिल्याची टीका मोदींनी यावेळी केली.

सावरकर, बाळासाहेबांच्या प्रशंसेचे आव्हान: स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठे असतानाही काँग्रेस त्यांची कधीच प्रशंसा करत नाही. त्यामुळे उद्धवसेनेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सार्वजनिक सभेत या दोघांची प्रशंसा करून दाखवावी, असे आव्हान मोदी यांनी दिले. 

पोलिस दलात २५ हजार युवतींची भरती, मुंबईत नवे मोठे विमानतळ: मुंबईत वाढवण बंदरासोबतच एक नवे मोठे विमानतळ बांधणार तसेच १५ नोव्हेंबरपासून वर्षभर बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती देशात उत्साहात साजरी करण्यासोबतच राज्य पोलिस दलात २५ हजार युवतींची भरती करण्याच्या घोषणाही मोदी यांनी केल्या.  

हिमाचल, कर्नाटक, तेलंगणात सर्व आश्वासने फिरविली
महाराष्ट्रात दुसऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीत   महायुती सरकारने अनेक विकास योजना राबविल्या. लाडकी बहीण योजनेची तर देशभरात चर्चा आहे. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राची प्रगती सहन होत नसल्याने आघाडी समवेत ते सत्तेवर आल्यास या चांगल्या कल्याणकारी योजना बंद करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
राज्यात महायुती असेल तरच प्रगती होईल असे मोदी यांनी, राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास चांगल्या योजनांना खीळ बसेल. यापूर्वीही समृद्धी महामार्गासह अनेक योजनांना काँग्रेस आघाडी सरकारने खीळ घातली होती. सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथे सर्व आश्वासने फिरविली. महाराष्ट्रात असेच करणार, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना वीज बिल मुक्ती दिली : फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात ८ हजार कोटींचा विमा दिला आहे, तसेच शेतकऱ्यांचे १०० टक्के वीज बिल माफ केले आहे. तसेच, पुढील पाच वर्षांसाठी शेतकऱ्यांना वीज बिल मुक्ती दिली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन: देशात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत महाराष्ट्र गेल्या दोन वर्षांपासून नंबर वनवर आहे. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करण्यात आली आहे, यातून महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळत असल्याचे मोदी म्हणाले.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: "Dangerous game of caste-fighting by Congress, hence 'Ek Hai Toh Seif Hai'", slams Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.