आप्तस्वकीय कोणाला तापदायक? सावंतवाडीत दीपक केसरकरांशी उद्धवसेनेची कडवी झुंज

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 4, 2024 10:35 AM2024-11-04T10:35:58+5:302024-11-04T10:39:22+5:30

Maharashtra Assembly Election 2024: याआधी सलग दोन निवडणुकांमध्ये पराभवाची धूळ चाखलेल्या राजन तेली यांच्याशी मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा लढत होत आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Emergency fever anyone? Shiv Sena UBT's bitter fight with Deepak Kesarkar in Sawantwadi | आप्तस्वकीय कोणाला तापदायक? सावंतवाडीत दीपक केसरकरांशी उद्धवसेनेची कडवी झुंज

आप्तस्वकीय कोणाला तापदायक? सावंतवाडीत दीपक केसरकरांशी उद्धवसेनेची कडवी झुंज

- महेश सरनाईक 
सिंधुदुर्ग - याआधी सलग दोन निवडणुकांमध्ये पराभवाची धूळ चाखलेल्या राजन तेली यांच्याशी मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा लढत होत आहे. मात्र, यावेळी तेली हे उद्धवसेनेकडून रिंगणात असून महायुतीमध्ये भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष विशाल परब यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने केसरकर यांना आघाडीप्रमाणेच आप्तस्वकीयांचाही सामना करावा लागणार आहे. 

मागील सलग तीन निवडणुकांमध्ये विजयी मिळविलेल्या केसरकर यांना सावंतवाडीचा बालेकिल्ला टिकविण्याचे उद्धवसेनेकडून कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीतही बिघाडी असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अर्चना घारे-परब यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.

२००९ नंतर प्रथमच राणेंचा पाठिंबा
- २००९ मध्ये दीपक केसरकर पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार झाले. यावेळी त्यांच्यासमवेत तत्कालीन काँग्रेसमध्ये असलेल्या राणेंचा पाठिंबा होता.
-  मात्र, २०१४ आणि २०१९ या दोन निवडणुका केसरकर यांनी शिवसेनेकडून लढविल्या आणि त्यांच्याविरोधात राजन तेली हेच उमेदवार होते. तेली २०१४ ला भाजपाकडून तर २०१९ ला अपक्ष म्हणून लढले. मात्र, या दोन्ही निवडणुकीत केसरकरांनी बाजी मारली होती.
- आता केसरकर चाैथ्यांदा रिंगणात असून यावेळी त्यांना भाजपची म्हणजे राणेंची साथ मिळणार आहे.

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?
- लोकसभा निवडणुकीत भाजपचे नारायण राणे विजयी झाले. सावंतवाडी मतदारसंघात त्यांना २९ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यात केसरकरांचा मोठा वाटा होता.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
गेल्या पाच वर्षात केसरकर यांनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली मात्र, त्यातील एकही मोठा प्रकल्प ते पूर्ण करू शकले नाहीत. 
केसरकर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून भाजपच्या विशाल परब यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीतील भाजपाची साथ मिळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Emergency fever anyone? Shiv Sena UBT's bitter fight with Deepak Kesarkar in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.