भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 10:37 AM2024-11-07T10:37:31+5:302024-11-07T10:38:07+5:30

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या भाजपमधील ४० जणांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसा आदेश काढला आहे. 

Maharashtra Assembly Election 2024: Expulsion of 40 BJP rebels for six years, still some rebels are still not actioned by the party | भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

 मुंबई - विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या भाजपमधील ४० जणांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसा आदेश काढला आहे. 

असे असले, तरी अजूनही काही बंडखोर उमेदवारांवर प्रदेश भाजपने कारवाई केलेली नाही. अहमदनगरच्या अकोले मतदारसंघात माजी आमदार वैभव पिचड बंडखोरी करून अपक्ष लढत आहेत. शिर्डीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरुद्ध बंडखोर राजेंद्र पिपाडा अपक्ष लढत आहेत. अहमदपूरमध्ये माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी माघार तर घेतली, पण दुसरे भाजप बंडखोर गणेश हाके यांना पाठिंबा दिला. हाके यांच्यावरही कारवाई केलेली नाही.  अकोला पश्चिममधील भाजप बंडखोर हरिश आलिमचंदानी, डॉ.अशोक ओळंबे यांनी बंडखोरी केली. रिसोडमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख हेही बंडखोर आहेत, पण अजून त्यांच्यावर कारवाई केलेली नाही.  

जे पदाधिकारी पक्षविरोधी कारवाया करतील, मित्रपक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत किंवा मित्रपक्ष सोडून दुसऱ्यांचा प्रचार करतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. आईसमान असलेल्या पक्षात राहण्याचा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना अधिकार नाही. 
- चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष 

यांची केली भाजपमधून हकालपट्टी
धुळे ग्रामीण - श्रीकांत करर्ले, सोपान पाटील, जळगाव शहर - मयूर कापसे, अश्विन सोनवणे, अकोट - गजानन महाले, वाशिम - नागेश घोपे, बडनेरा - तुषार भारतीय, अमरावती - जगदीश गुप्ता, अचलपूर - प्रमोद गड्रेल, साकोली - सोमदत्त करंजेकर, आमगाव - शंकर मडावी, चंद्रपूर - ब्रिजभूषण पाझारे, ब्रह्मपुरी - वसंत वरजूरकर, वरोरा - राजू गायकवाड, अतेशाम अली, उमरखेड - भाविक भगत, नटवरलाल उंटवल, नांदेड उत्तर - वैशाली देशमुख, मिलिंद देशमुख, नांदेड दक्षिण - दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे, घनसावंगी - सतीश घाटगे, जालना - अशोक पांगारकर, गंगापूर - सुरेश सोनावणे, वैजापूर - एकनाथ जाधव, मालेगाव बाह्य - कुणाल सूर्यवंशी, बागलाण - आकाश साळुंखे, जयश्री गरुड, नालासोपारा - हरीश भगत, भिवंडी ग्रामीण - स्नेहा पाटील, कल्याण पश्चिम - वरुण पाटील, मागाठणे - गोपाळ जव्हेरी, जोगेश्वरी पूर्व - धर्मेंद्र ठाकूर, अलिबाग - दिलीप भोईर, नेवासा - बाळासाहेब मुरकुटे, सोलापूर शहर उत्तर - शोभा बनशेट्टी, अक्कलकोट - सुनील बंडगर, श्रीगोंदा - सुवर्णा पाचपुते, सावंतवाडी - विशाल परब.

 

 

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Expulsion of 40 BJP rebels for six years, still some rebels are still not actioned by the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.