Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 02:46 PM2024-11-19T14:46:23+5:302024-11-19T14:47:54+5:30

Vinod Tawade news: मतदानाच्या एक दिवस आधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तावडेंकडे काही डायऱ्याही सापडल्याचा आरोप बविआचे आमदार, उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Hitendra Thakur BVA caught BJP Leader Vinod Tawde distributing money in nalasopara Hotel? Vinod Tawde's first reaction... | Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...

Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...

भाजपाचे देशपातळीवर पोहोचलेले नेते विनोद तावडे यांना एका हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना बविआच्या नेत्यांनी पकडले आहे. यावरून आता मतदानाच्या एक दिवस आधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तावडेंकडे काही डायऱ्याही सापडल्याचा आरोप बविआचे आमदार, उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी केली आहे. यावर आता विनोद तावडेंची माध्यमांना प्रतिक्रिया आली आहे.

आमचा मित्र पक्ष आहे, ते म्हणतायत की मी पैसे वाटत होतो. हे ठाकूर मला ओळखतात मी ४० वर्षे पक्षाचे काम करतो. नालासोपारामध्ये वाड्याहून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आमच्या समोरच्या पक्षाचा असा समज झाला की मी पैसे वाटायला आलो. सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही असे मी म्हटले, असे तावडे म्हणाले. 

तसेच हितेंद्र ठाकूर असतील, क्षितीज ठाकूर असतील तेही आले त्यांची माझी चर्चा सुरु आहे. जर पैसे वाटप होत असेल तर त्यांची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज, पोलीस सगळे आहेत. निवडणुकीच्या दिवशी मतयंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची, ऑब्जेक्शन घ्यायचे तर कसे घ्यायचे अशा गोष्टी मी सांगत होतो, असे तावडे म्हणाले. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Hitendra Thakur BVA caught BJP Leader Vinod Tawde distributing money in nalasopara Hotel? Vinod Tawde's first reaction...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.