विधानसभेसाठी 'ती'ला किती संधी; ३६० महिला उमेदवार उतरल्या रिंगणात, अपक्ष झाल्या दुप्पट
By दीपक भातुसे | Published: November 9, 2024 11:29 AM2024-11-09T11:29:53+5:302024-11-09T11:44:39+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेच्या रिंगणात महिला उमेदवारांची संघ्या २०१९ च्या तुलनेत वाढली असून, त्यात अपक्ष महिला उमेदवार दुपटीने वाढल्या आहेत. यंदा ३६० महिला उमेदवार रिंगणात असून, त्यात २३६ जणींनी अपक्ष अर्ज भरलेला आहे.
- दीपक भातुसे
मुंबई - विधानसभेच्या रिंगणात महिला उमेदवारांची संघ्या २०१९ च्या तुलनेत वाढली असून, त्यात अपक्ष महिला उमेदवार दुपटीने वाढल्या आहेत. यंदा ३६० महिला उमेदवार रिंगणात असून, त्यात २३६ जणींनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. गेल्या वेळी २४ महिला आमदार होत्या. यंदा किती जणींसाठी विधानसभेची द्वारे खुलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाच्या पाथरीच्या उमेदवार निर्मला विटेकर यांची उमेदवारी रद्द करून त्यांचा मुलगा राजेश विटेकर याला उमेदवारी दिली, तर शरद पवार गटाने मोहळच्या सिद्दी कदम यांची उमेदवारी रद्द करून राजू खरे यांना दिली आहे. भाजपकडूनही श्रीगोंदा मतदारसंघातील महिला उमेदवार प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी बदलून त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी आहे. अजित पवार गटाकडून सना मलिक यांना अणुशक्तीनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या या उमेदवारंनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे.
केवळ एकाच ठिकाणी...
राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी केवळ एकाच मतदारसंघात महिला उमेदवार आमने - सामने आहेत. यात पुण्यातील पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याविरोधात शरद पवार गटाच्या अश्विनीताई कदम रिंगणात आहेत.
भाजप महिला
उमेदवार (१७)
मनीषा चौधरी - दहिसर
विद्या ठाकूर - गोरेगाव
भारती लवेकर - वर्सोवा
स्नेहा दुबे - भाजप
सुलभा गायकवाड - कल्याण पूर्व
मंदा म्हात्रे - बेलापूर
माधुरी मिसाळ - पर्वती
मोनिका राजळे - शेवगाव
देवयानी फरांदे - नाशिक मध्य
सीमा हिरे - नाशिक पश्चिम
नमिता मुंदडा - केज
अर्चना पाटील-चाकूरकर - लातूर शहर
मेघना बोर्डीकर - जिंतूर
अनुराधा चव्हाण - फुलंब्री
श्वेता महाले - चिखली
श्रीजया चव्हाण - भोकर
सई डहाके - करंजा
शिंदेसेना (७)
सुवर्णा करंजे - विक्रोळी
मनीषा वायकर - जोगेश्वरी पूर्व
यामिनी जाधव - भायखळा
शायना एनसी - मुंबादेवी
मंजुळा गावित - साक्री
संजना जाधव - कन्नड
भावना गवळी - रिसोड
अजित पवार गट (५)
सना मलिक - अणुशक्तीनगर
आदिती तटकरे - श्रीवर्धन
मीनल साठे - माढा
सरोज आहिरे - देवळाली
सुलभा खोडके - अमरावती
शरद पवार गट (११)
राखी जाधव - घाटकोपर पूर्व
सुलक्षणा शीलवंत - पिंपरी
अश्विनीताई कदम - पर्वती
नंदिनी कुपेकर - चंदगड
अरुणादेवी पिसाळ - वाई
राणी लंके - पारनेर
दीपिका चव्हाण - बागलाण
सुनीता चारोस्कर - दिंडोरी
रोहिणी खडसे - मुक्ताईनगर
मयुरा काळे - आर्वी
भाग्यश्री आत्राम - अहेरी
उद्धवसेना (१०)
ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व
प्रविणा मोरजकर - कुर्ला
श्रद्धा जाधव - वडाळा
लीना गरड - पनवेल
स्नेहल जगताप - महाड
अनुराधा नागवडे - श्रीगोंदा
जयश्री महाजन - जळगाव शहर
वैशाली सूर्यवंशी - पाचोरा
जयश्री शेळके - बुलडाणा
रुपाली पाटील - हिंगोली
काँग्रेस (८)
संगीता वाझे - मुलुंड
ज्योती गायकवाड - धारावी
प्रभावती घोगरे - शिर्डी
स्वाती वाकेकर - जळगाव जामोद
मीनल पाटील-खतगावकर - नायगाव
यशोमती ठाकूर - तिवसा
पूजा तावकर - भंडारा
अनुजा केंदार - सावनेर