"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 03:57 PM2024-11-17T15:57:14+5:302024-11-17T15:58:28+5:30

Maharashtra Assembly Election 2024: "शरद पवार अन् राहुल गांधींनी व्होट जिहादसारख्या गोष्टी पसरवल्या, लाज पाटली पाहिते."

Maharashtra Assembly Election 2024 'Is Sharad Pawar afraid to talk about Hindus?', Kirit Somaiya furious over vote jihad | "शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले

"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले

Maharashtra Vidhan Sabha Chunav 2024: महाराष्ट्र निवडणुकीत ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. पण, या पाठिंब्यासाठी 'मविआ'समोर काही अटीही ठेवल्या आहेत. या अटींवरुन आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप विरोधकांवर व्होट जिहादचे आरोप करत आहे. यावरुन आता भाजप नेते किरीट सोमय्या  (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार टीका केला. 

किरीट सोमय्याशरद पवारांवर संतापले
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, "शरद पवार यांना हिंदूंबद्दल बोलण्याची लाज वाटते की, भीती वाटते? भाजपला मतदान करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची भाषा मौलाना सज्जाद नोमानी यांच्यासारखे लोक जाहीरपणे करतात. शरद पवार यांनी अखिल भारतीय उलेमा बोर्ड आणि मराठी मुस्लिम सेवा संघाला पाठिंबा दिला आहे. उलेमा बोर्डाच्या मागण्या शरद पवार आणि मविआने मान्य केले आहेत. शरद पवार अन् राहुल गांधी यांच्या कुटुंबाने व्होट जिहादसारख्या गोष्टी पसरवल्या, त्यांना लाज वाटली पाहिजे," अशी घणाघाती टीका सोमय्या यांनी केली.

शरद पवारांचे भाजपवर टीकास्त्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन टीका केली. ते म्हणाले की, फडणवी आणि त्यांचे साथीदार 'व्होट जिहाद' शब्दप्रयोग करुन धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 

दरम्यान, 7 नोव्हेंबर रोजी उलेमा बोर्डाने राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून एमव्हीएने आपल्या मागण्या मान्य केल्यास त्यांचा प्रचार करू, असे म्हटले आहे. मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण देणे, आरएसएसवर बंदी घालणे...अशा 17 मागण्यांचे पत्र बोर्डाने मविआला पाठवले होते. या मागण्या मविआने मान्य केल्या आहेत.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 'Is Sharad Pawar afraid to talk about Hindus?', Kirit Somaiya furious over vote jihad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.