कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 08:18 AM2024-11-18T08:18:40+5:302024-11-18T08:25:36+5:30

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरमधील करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्तीचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर प्रचार आटोपून परतत असताना जीवघेणा हल्ला झाला आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Jansuraj Shakti candidate Santaji Ghorpade attacked, stabbed with sharp weapons in Kolhapur  | कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 

कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरमधीलकरवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्तीचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर प्रचार आटोपून परतत असताना जीवघेणा हल्ला झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी संताजी घोडपडे यांचं वाहन अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात संताजी घोरपडे हे जखमी झाले आहेत. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्तीचे उमेदवार संताजी घोरपडे हे प्रचारसभा आटोपून येत असताना मानवाडजवळ सहा ते सात जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली. हे लोक कार्यकर्ते असतील म्हणून विचारपूस करण्यासाठी संताजी घोरपडे हे खाली उतरले. मात्र या टोळक्याने संताजी घोरपडे हे खाली उतरताच त्यांच्यावर काठी आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संताजी घोरपडे हे जखमी झाले. त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान हल्लेखोर दगडफेक करून हल्लेखोर पसार झाले.

संताजी घोरपडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Jansuraj Shakti candidate Santaji Ghorpade attacked, stabbed with sharp weapons in Kolhapur 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.