मराठवाडा, विदर्भाला अडीच वर्षे वनवास भोगावा लागला, एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 10:26 AM2024-11-09T10:26:01+5:302024-11-09T10:27:37+5:30
Maharashtra Assembly Election 2024: नैसर्गिक युती तोडून स्वार्थासाठी असंगाशी संग केला. त्यामुळे आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मराठवाडा व विदर्भाला वनवास भोगावा लागला. एक पैशाचे काम या काळात झाले नाही. सर्व चालू कामे बंद केली. महाविकास आघाडीवाले हे विकासाचे मारेकरी आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.
धाराशिव - नैसर्गिक युती तोडून स्वार्थासाठी असंगाशी संग केला. त्यामुळे आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मराठवाडा व विदर्भाला वनवास भोगावा लागला. एक पैशाचे काम या काळात झाले नाही. सर्व चालू कामे बंद केली. महाविकास आघाडीवाले हे विकासाचे मारेकरी आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील, अजित पिंगळे यांच्यासाठी शिंदे यांनी परंडा, धाराशिव व उमरगा येथे सभा घेतल्या. यावेळी ते म्हणाले, आमच्या उठावानंतर सत्तेत येताच मराठवाडा ग्रीडला मान्यता दिली. प्रकल्प मंजूर केले. सामान्यांना रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. तुम्ही काय केले? विकास कामांत केवळ स्पीडब्रेकर टाकण्याचे काम केले. आम्ही लाडकी बहीण योजना आणली. महिलांना बस प्रवासात सवलत, शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, ज्येष्ठांना वयोश्री, कामगारांसाठीही योजना आखून त्या पूर्णत्वास नेल्या. या योजनांना घरी बसून विरोध करणाऱ्यांना आता तुम्ही कायमचे घरी बसवा.
धनुष्यबाण चोरायला काय खेळणे आहे का?
बार्शी (सोलापूर) : काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. प्राणपणाने आम्ही जपणार आहोत. काही लोक म्हणतात, आमचा धनुष्यबाण चोरला, धनुष्यबाण चोरायला काय खेळणे आहे का? एकनाथ शिंदेने धनुष्यबाण वाचविण्याचा प्रयन केला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. बार्शी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे सेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ भगवंत मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.