वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:12 AM2024-10-28T06:12:37+5:302024-10-28T06:13:42+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : कुडाळमधून निलेश राणे यांचा सामना उद्धवसेनेच्या वैभव नाईक यांच्याशी असणार आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची दुसरी यादी रविवारी रात्री जाहीर करण्यात आली आहे. यात २० उमेदवारांचा समावेश आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. देवरा यांची लढत आता उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्याशी होणार आहे.
कुडाळमधून निलेश राणे यांचा सामना उद्धवसेनेच्या वैभव नाईक यांच्याशी असणार आहे. भावना गवळी यांना काही दिवसांपूर्वी विधान परिषदेची संधी देण्यात आली होती. यामध्ये त्या जिंकून आल्या होत्या. पण लोकसभेला त्यांना संधी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची माहिती होती. अखेर भावना गवळी यांना रिसोडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिंदे-फडणवीस चर्चा
महायुतीच्या जागावाटपाचा तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वर्षा बंगल्यावर चर्चा केली. चर्चेत अनेक जागांवार तोडगा काढण्यात आली. त्यानंतर काही वेळातच शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
वरळीचा तिढा सुटला
मुंबईतील वरळी मतदारसंघावर भाजप व शिंदेसेनेचा दावा होता. उद्धव सेनेने आदित्य ठाकरे यांना आधीच उमेदवारी दिली आहे. भाजप ही जागा सोडायला तयार नव्हते, तिथे शायना एनसी यांच्यासह दोन पर्यायी उमेदवार भाजपकडे होते. आदित्य यांच्याविरुद्ध आपल्या पक्षातर्फे राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांना लढवावे, असा आग्रह मुख्यमंत्री शिंदे यांचा होता. अखेर देवरा यांना संधी देण्यात आली