राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 09:55 AM2024-11-05T09:55:51+5:302024-11-05T09:57:44+5:30
Maharashtra Assembly Election 2024: एमआयएम पक्षाने राज्यात १५ ठिकाणी उमेदवार दिले. पुण्याच्या हडपसर येथे एका उमेदवाराला पाठिंबा दर्शविला आहे. मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये म्हणून कमी उमेदवार दिले.
छत्रपती संभाजीनगर - एमआयएम पक्षाने राज्यात १५ ठिकाणी उमेदवार दिले. पुण्याच्या हडपसर येथे एका उमेदवाराला पाठिंबा दर्शविला आहे. मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये म्हणून कमी उमेदवार दिले. जिथे मुस्लिम मतदार जास्त आहेत, तेथेच उमेदवार दिल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी यापूर्वीच नमूद केले आहे.
२०१९ मध्ये एमआयएमने राज्यात ४४ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यातील दोन उमेदवारांना यश मिळाले होते. २०१९ मध्ये एमआयएम उमेदवारांमुळे सर्वाधिक फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला होता. यंदा एमआयएमने कमी उमेदवार देऊन जास्त निवडून आणण्यावर भर दिला आहे. कोणत्या मतदारसंघात मुस्लीम, दलित मतदार आहेत, अशा मोजक्याच विधानसभांचा अभ्यास केला.
एमआयएम पक्षाचे उमेदवार
एमआयएम पक्षाने औरंगाबाद पूर्व : इम्तियाज जलील, औरंगाबाद मध्य : नासेर सिद्दीकी, भिवंडी वेस्ट : वारीस पठाण, वर्सोवा : रईस लष्करीया, भायखळा : फय्याज अहेमद, मुंब्रा : सैफ पठाण, कुर्ला : बबिता कानडे, मालेगाव : मुफ्ती इस्माईल, धुळे : फारूक शहा, सोलापूर : फारूक शाब्दी, मुर्तूझापूर : माणिकराव सरवदे, मिरज : महेश कांबळे, नांदेड साऊथ : सय्यद मोईन, नागपूर : कीर्ती डोंगरे तर पुण्याच्या हडपसर येथे अझर तांबोळी यांना पाठिंबा दर्शविला आहे.