मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 08:05 PM2024-10-26T20:05:34+5:302024-10-26T20:06:06+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पाचवी यादी आज जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 - MNS Raj Thackeray fifth list of 15 candidates announced; Who is in Solapur, Kolhapur, Beed? | मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?

मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?

मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर निवडणूक लढवत असून आतापर्यंत ४ उमेदवार याद्या मनसेने जाहीर केल्यात. आज मनसेची पाचवी उमेदवार यादी घोषित झाली असून त्यात कोल्हापूर, बीड, नागपूर, रायगड, सोलापूर जिल्ह्यातील काही जागांचा समावेश आहे. 

मनसेच्या पाचव्या यादीत कोणाचा समावेश?

पनवेल - योगेश चिले
खामगाव - शिवशंकर लगर
अक्कलकोट - मल्लिनाथ पाटील
सोलापूर शहर मध्य  - नागेश पासकंटी
जळगाव जामोद - अमित देशमुख
मेहकर - भय्यासाहेब पाटील
गंगाखेड - रुपेश देशमुख
उमरेड - शेखर टुंडे
फुलंब्री - बाळासाहेब पाथ्रीकर
परांडा - राजेंद्र गपाट
उस्मानाबाद - देवदत्त मोरे
काटोल - सागर दुधाने
बीड - सोमेश्वर कदम 
श्रीवर्धन - फैझल पोपेरे
राधानगरी - युवराज येडुरे

ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील जवळीक गेल्या काही महिन्यांत वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळेच की काय कोपरी-पाचपाखाडी, अंबरनाथ, कल्याण (पूर्व) अशा काही विधानसभा मतदारसंघांत संधी असूनही मनसेने शिंदेसेनेविरुद्ध उमेदवार दिले नसल्याचे मत राजकीय निरीक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधातही उमेदवार दिलेला नसल्यामुळे महायुतीचे नेते व मनसे यांच्यात छुपी युती झाल्याची चर्चाही येथे सुरू आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - MNS Raj Thackeray fifth list of 15 candidates announced; Who is in Solapur, Kolhapur, Beed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.