भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 02:44 PM2024-11-21T14:44:55+5:302024-11-21T14:45:07+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यात विक्रमी मतदानाची नोंद करण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी विक्रमी मतदान पार पडलं आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ६५.११ टक्के मतदान झालं आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांधिक ७६.२५ टक्के एवढं मतदान झालं. तर मुंबई शहर ५२.०७ टक्के आणि मुंबई उपनगर ५५.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मतदानासाठी उदासीनता पाहायला मिळाली. महत्त्वाचे म्हणजे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात ७३.६८ टक्के इतकं विक्रमी मतदान झालं आहे. राज्यातील २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला मतांची टक्केवारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मतदानासाठी काही तास उरले असताना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर सारख्या शहरी भागांमध्ये कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री उशीरा आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.११ टक्के मतदान झालं आहे.
मात्र राज्यात २५ असे मतदारसंघ आहेत त्यामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदाना झालं आहे. तर २५ मतदारसंघ असे आहेत ज्यामध्ये ५३ टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांधिक मतदान झाल्याचे समोर आलं आहे. तर मुंबईतल्या अनेक मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक मतदान झालेले २५ मतदारसंघ
84.79 टक्के करवीर
81.75 टक्के चिमूर
81.72 टक्के कागल
80.54 टक्के ब्रह्मपुरी
80.00 टक्के सिल्लोड
79.89 टक्के नेवासा
79.04 टक्के शाहूवाडी
79.02 टक्के पलूस-कडेगाव
78.70 टक्के नवापूर
78.47 टक्के शिराळा
78.26 टक्के राधानगरी
78.06 टक्के शिरोळ
77.90 टक्के सांगोला
77.75 टक्के दिंडोरी
77.75 टक्के विक्रमगड
77.64 टक्के कोरेगाव
77.20 टक्के भोकरदन
77.06 टक्के घनसावंगी
76.95 टक्के पैठण
76.55 टक्के अलिबाग
76.26 टक्के कराड दक्षिण
76.10 टक्के इंदापूर
76.06 टक्के खामगाव
75.99 टक्के उरण
75.73 टक्के माढा
सर्वात कमी मतदान झालेले मतदारसंघ
44.49 टक्के कुलाबा
47.75 टक्के अंबरनाथ
48.76 टक्के मुंबादेवी
49.20 टक्के भिवंडी पूर्व
49.70 टक्के धारावी
50.07 टक्के चांदिवली
50.11 टक्के हडपसर
50.36 टक्के वांद्रे पश्चिम
50.90 टक्के शिवाजीनगर
51.20 टक्के वर्सोवा
51.29 टक्के पिंपरी
51.43 टक्के सायन कोळीवाडा
51.50 टक्के ऐरोली
51.76 टक्के मीरा भाईंदर
52.00 टक्के मानखुर्द शिवाजीनगर
52.01 टक्के मुंब्रा-कळवा
52.18 टक्के कोथरूड
52.25 टक्के ओवळा-माजिवडा
52.53 टक्के मलबार हिल
52.66 टक्के कलिना
52.75 टक्के कुर्ला
52.78 टक्के वरळी
52.80 टक्के जळगाव शहर
52.85 टक्के पुणे कॅन्ट
53.00 टक्के अंधेरी पश्चिम