राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 07:53 AM2024-11-01T07:53:04+5:302024-11-01T07:53:25+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : प्रदेश भाजपचा प्रतिहल्ला, आकडेवारीसह दिला तपशील
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी २७ ते ३२ टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येण्याचे प्रमाण वर्षानुवर्षे होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे प्रमाण ४८ टक्क्यांवर गेले आणि महायुती सरकारमध्ये त्यांच्याच पुढाकाराने हे प्रमाण तब्बल ५२ टक्क्यांवर गेले, असे प्रत्युत्तर प्रदेश भाजपने दिले आहे.
महाराष्ट्रात येऊ पाहणारी परकीय गुंतवणूक कमी झाली, दुसऱ्या राज्यात गेली, हा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळला. सातत्याने विविध गुंतवणूकदारांशी संवाद, संपर्क यातून राज्यातील गुंतवणुकीचे फडणवीस हे एकप्रकारे शिल्पकार ठरल्याचे अलीकडच्या १० वर्षांत सिद्ध झाले आहे. हा दावा बळकट करणारी आकडेवारीसुद्धा अतिशय सुस्पष्ट आहे, असे बावनकुळे म्हणाले.
एअरबस प्रकल्प कसा गेला?
उद्योगपती रतन टाटा हे टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातच सुरू करणार होते. पण, भाजप आणि राज्य सरकारने हा प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जयराम रमेश यां केला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिले आहे. टाटा एअरबस प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांचा विचार करण्यात येत असल्याचे वृत्त २३ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाले होते. तेव्हा मविआ सरकार राज्यात होते. प्रकल्प गुजरातमध्ये होणार असे वृत्त १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाले होते. विरोधी पक्षात असूनही मी हा प्रकल्प महाराष्ट्रातच यावा म्हणून खूप प्रयत्न केले. पण, त्यावेळी मविआ काळात औद्योगिक गुंतवणुकीला पोषक वातावरण नाही, असे टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले होते, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनची आकडेवारी
देवेंद्र फडणवीस सरकार (२०१४-१९) या काळात राज्यात आलेला एफडीआय
२०१५-१६ : ६१,४८२ कोटी
२०१६-१७ : १,३१,९८० कोटी
२०१७-१८ : ८६,२४४ कोटी
२०१८-१९ : ५७,१३९ कोटी
एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ : २५,३१६ कोटी