भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद

By यदू जोशी | Published: November 14, 2024 08:40 AM2024-11-14T08:40:47+5:302024-11-14T08:52:15+5:30

Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पार्टीनं  ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत.

Maharashtra Assembly Election 2024: My booth, strongest Booth campaign from BJP, Narendra Modi will interact with 1 lakh booth heads in Maharashtra | भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद

भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद

महाराष्ट्राती विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, मतदारांना आपल्या सोबत जोडून घेण्यासाठी भाजपाकडून बुथपातळीवर नियोजन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं  ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. हा विशेष संवाद नमो ॲपच्या माध्यमातून वऑनलाइन पद्धतीनं १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकराला होईल.

भाजपने आपल्या गोटातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशानं या महत्त्वपूर्ण उपक्रमाची आखणी केली आहे. या संवादाद्वारे पंतप्रधान मोदी भाजपच्या निवडणूक रणनितीला बळकटी देतील आणि बुथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशा-निर्देश देतील.

हा संवाद कार्यक्रम भाजपच्या निवडणूक तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. बुथ प्रमुख हा निवडणुकीच्या व्यवस्थापनात कणा मानला जातो आणि त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेतील त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट होतील. तसंच, पंतप्रधान मोदी यांचा थेट संवाद कार्यकर्त्यांना नवा जोम आणि आत्मविश्वास प्रदान करेल.

भाजपनं महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ हा उपक्रम कार्यकर्त्यांना एकजूट करणं आणि बुथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: My booth, strongest Booth campaign from BJP, Narendra Modi will interact with 1 lakh booth heads in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.