उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 06:35 AM2024-11-08T06:35:42+5:302024-11-08T06:37:11+5:30

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी काल नागपुरात जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमाची खिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवनी येथील जाहीर सभेतील भाषणातून उडविली. कुणाचेही नाव न घेता ते म्हणाले, काल दिल्लीवरून एक फुसका फटाका येऊन गेला.

Maharashtra Assembly Election 2024: Not Panchsutri but Thapasutri, Chief Minister's criticism | उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

भंडारा - काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी काल नागपुरात जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमाची खिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवनी येथील जाहीर सभेतील भाषणातून उडविली. कुणाचेही नाव न घेता ते म्हणाले, काल दिल्लीवरून एक फुसका फटाका येऊन गेला. थापासुत्री मारून गेला. त्यांची ही पंचसुत्री नव्हे तर थापासूत्री आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.

महायुतीमधील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी पवनी येथील संभाजी चुटे रंगमंदीराच्या प्रांगणात झालेल्या सभेत ते म्हणाले, आमच्या सरकारने आणलेल्या योजनाच त्यांनी ढापल्या आहेत. एकीकडे आम्ही आणलेल्या योजनांना विरोध करायचा, दुसरीकडे आमच्या योजना स्वतःच ढापायच्या, असा हा प्रकार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हीच मंडळी न्यायालयात गेली होती. आता नाव बदलून ते हीयोजना देऊ पहात आहेत.ते फेक नरेटिव्ह पसरवणारे आहेत. आमचे सरकार प्रिंटिंग मिस्टेक वालेनाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

शिंदे म्हणाले मी शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. शेतकरी, गरिबांच्या वेदनांची जाणीव मला आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार? कल्याणकारी योजनांना विरोध करणारी ही मंडळी त्यांचे सरकार सत्तेत आल्यास आम्हाला जेलमध्ये टाकू असे म्हणत आहेत. शेतकरी बहिणींसाठी दहा वेळासुद्धा जेलमध्ये जायला आम्ही तयार आहोत. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, विकासाच्या मारेकऱ्यांना कायम घरी बसवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Not Panchsutri but Thapasutri, Chief Minister's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.