प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 06:17 AM2024-11-02T06:17:51+5:302024-11-02T06:21:33+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : सध्या दिवाळीची धामधूम असल्याने प्रचार थंडावला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : Only 14 days to campaign; Candidates race with all party leaders to reach voters | प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ

प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ

Maharashtra Assembly Election 2024 : पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थाने ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळणार आहेत. या कालावधीत दोनच रविवार मिळणार आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहाेचण्यासाठी उमेदवारांना माेठी कसरत करावी  लागणार आहे. 

सध्या दिवाळीची धामधूम असल्याने प्रचार थंडावला आहे. दिवाळी ३ नोव्हेंबरला संपत आहे, तर ४ नोव्हेंबर ही अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर प्रचार १८ नोव्हेंबरला संपणार आहे. परिणामी प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळत आहेत. या कालावधीत  केवळ १० नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबरला रविवार आला आहे. रविवार प्रचाराचा वार ठरतो.  

उमेदवारांचा कस लागणार 
प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळत असल्याने मतदारांपर्यंत पोहाेचण्यासाठी उमेदवारांचा कस लागणार आहे. त्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांना प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. प्रचार रॅली आणि  नेत्यांच्या जाहीर सभा कुठे घ्यायच्या याचे वेळापत्रक करावे लागणार आहे.

सोशल मीडियाचा आधार   
सर्वपक्षीय उमेदवार सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाले आहेत. या माध्यमातून प्रचार केला जात आहे. आचारसंहिता लागू असल्याने सोशल मीडियावर प्रचार करताना  आयोगाने घातलेल्या अटी, शर्तींचे पालन उमेदवारांना करावे लागणार आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Only 14 days to campaign; Candidates race with all party leaders to reach voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.