पूजा खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:34 PM2024-10-30T12:34:52+5:302024-10-30T12:50:58+5:30

Dilip Khedkar's Election affidavit: काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण खूप गाजले होते. वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत पत्नीविषयी माहिती दिली होती. आता मुलगी वादात सापडल्यानंतर विधानसभेला पत्नीच्या रकान्यामध्ये ''लागू नाही'' असा उल्लेख केला आहे. 

Maharashtra Assembly Election 2024: Pooja Dilip Khedkar's father stood for election in savgaon; in Lok Sabha affidavit said Manorama khedkar is wife, in Vidhan Sabha showed 'no' | पूजा खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले

पूजा खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले

काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण खूप गाजले होते. युपीएससीने पूजा खेडकरला बरखास्त करत तिच्यावर कायमची बंदी घातली आहे. पूजा खेडकरमुळे खेडकर कुटुंबीयांचे एकेक कारनामे समोर आले होते. पूजाच्या आईवडिलांनी घटस्फोट दाखविला होता. परंतू माजी सरकारी अधिकारी, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत पत्नीविषयी माहिती दिली होती. आता मुलगी वादात सापडल्यानंतर विधानसभेला पत्नीच्या रकान्यामध्ये ''लागू नाही'' असा उल्लेख केला आहे. 

दिलीप खेडकर यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांचे अॅफिडेविट निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे. दिलीप खेजकर यांची पत्नी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हे दोघेही सहआरोपी आहेत. जमीन हडपल्या प्रकरणी शेतकऱ्यांना बंदूक दाखविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रात दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर यांची पत्नी या रकान्यात उल्लेख करत माहिती दिली होती. परंतू, पूजा खेडकरने युपीएससीला वडील व आई घटस्फोट घेऊन वेगळे झाल्याची माहिती दिली होती. ही बाब तिने ऑन कॅमेरा युपीएससी इंटर्व्ह्यूमध्ये देखील सांगितली होती. हे प्रकरण बाहेर येताच पूजा खेडकरला युपीएससी सिलेक्शनमध्ये लाभ मिळावा म्हणून पती-पत्नीने घटस्फोट घेतल्याचे आरोपही केले जात होते. पूजाने ओबीसी ‘नॉन-क्रीमी लेयर’चा लाभ घेतला होता. 

दिलीप खेडकर यांनी यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेसाठीच्या शपथपत्रात पत्नीची माहिती दिलेली नाही. लोकसभेला पत्नी म्हणून केलेला उल्लेख विधानसभेला टाळण्यात आला आहे. मुळात दोघांनी २००९ मध्येच पुण्यातील कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता व ते २०१० ला वेगळे झाले होते. घटस्फोटानंतरही हे दोघे घरात एकत्र राहत होते, अशाही चर्चा होत्या. 

खेडकर यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्यावर विनयभंग, जिवे मारण्याची धमकी आदी गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याकडे ८.९१ लाखांचे सोने आहे. त्यांच्या मालकीची ३१ एकर जमीन आहे. तसेच पनवेल, भालगाव व अहमदनगरमध्ये दीड कोटी रुपयांचे फ्लॅट आहेत. तसेच २०२२-२३ मध्ये ४३.५९ लाखांचे उत्पन्न त्यांनी दाखविलेले आहे. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Pooja Dilip Khedkar's father stood for election in savgaon; in Lok Sabha affidavit said Manorama khedkar is wife, in Vidhan Sabha showed 'no'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.