प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 12:58 PM2024-10-31T12:58:17+5:302024-10-31T12:58:50+5:30

Prakash Ambedkar health Update: पहाटेच्या सुमारास आंबेडकरांच्या छातीत दुखू लागले होते. यामुळे त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

maharashtra assembly election 2024 Prakash Ambedkar News: Prakash Ambedkar admitted to hospital early in the morning due to chest pain; Angiography will be done | प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार

प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सर्वात आधी उमेदवार जाहीर करणाऱ्या वंचित आघाडी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना गुरुवारी पहाटे छातीत दुखत असल्याने पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याचा माहिती वंचित आघाडीने दिली आहे. 

पहाटेच्या सुमारास आंबेडकरांच्या छातीत दुखू लागले होते. यामुळे त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हृदयामध्ये रक्ताची गाठ आढळून आली आहे. यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील काही तासांत अँजिओग्राफी केली जाणार आहे, असे वंचितने ट्विट करून म्हटले आहे. 

यामुळे पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या  निरीक्षणात राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत., असेही वंचितने स्पष्ट केले आहे. 

कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे.
 

Web Title: maharashtra assembly election 2024 Prakash Ambedkar News: Prakash Ambedkar admitted to hospital early in the morning due to chest pain; Angiography will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.