'महाराष्ट्रात महायुतीचा विजय होईल', मतमोजणीला सुरुवात होताच अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 08:48 AM2024-11-23T08:48:09+5:302024-11-23T08:51:09+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा विजय होईल, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा विजय होईल, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
मतमोजणीला सुरुवात होताच अशोक चव्हाण म्हणाले की, मतमोजणीला आताच सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलचे कल हे महायुतीच्या बाजूने आले आहेत. नांदेड जिल्ह्याचं म्हणाल तर नांदेड जिल्हा हा महायुतीच्या मागे उभा राहिलेला आहे. येथे अनेक विकासकामं झाली आहेत. तसेच सरकारचं प्रत्येक जिल्ह्यावर लक्ष राहिलेलं आहे. त्यामुळे सामान्य माणसाला दिलासा देणारे अनेक निर्णय झालेले असल्याने त्यामुळे मतदार हे इतर कुठलाही विचार न करता स्वत:च्या हिताचं असलेल्या सरकारच्या मागे उभे राहतील, असा मला विश्वास आहे. तसेच आजच्या निकालामध्ये हे स्पष्ट होईल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आजच सरकार स्थापनेचा दावा करू म्हणणाऱ्या महाविकास आघाडीला अशोक चव्हाण यांनी टोला लगावला आहे. दावा करणं हा नंतरचा विषय आहे. निकाला आल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा केला जातो. निकाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे उतावळेपणा न करता निकाल हाती येऊ द्या, मगच स्पष्टता येईल, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.