भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
By राजेश भोजेकर | Published: November 6, 2024 08:22 AM2024-11-06T08:22:19+5:302024-11-06T08:22:59+5:30
Maharashtra Assembly Election 2024: हेवीवेट मंत्री व नेते सुधीर मुनगंटीवार पुन्हा बल्लारपूर या मतदारसंघात भाजपाकडून रिंगणात उतरले आहेत. सलग तीन टर्म आमदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या विकासकामांवर ते मतदारांना साद घालत आहेत.
- राजेश भोजेकर
चंद्रपूर - हेवीवेट मंत्री व नेते सुधीर मुनगंटीवार पुन्हा बल्लारपूर या मतदारसंघात भाजपाकडून रिंगणात उतरले आहेत. सलग तीन टर्म आमदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या विकासकामांवर ते मतदारांना साद घालत आहेत. त्यांची लढत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्याशी आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा सामना केलेले मुनगंटीवार आता नव्या उमेदीने रिंगणात उतरल्याने भाजपच्या बालेकिल्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. या मतदारसंघात काँग्रेस विचारांचा बऱ्यापैकी प्रभाव असला तरी येथील जातीय समिकरणांची गणीते काँग्रेसला नेहमीच फटका देत आली आहेत. यावेळी काँग्रेसने तिकिट नाकारल्याने मागील दोन वर्षांपासून निवडणूकीच्या तयारीत असलेल्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी कायम ठेवलेली उमेदवारी मतांचे ध्रुवीकरण करण्याची चिन्हे आहेत.
विकासकामांचा मुद्दा अधिक प्रभावी
सुधीर मुनगंटीवार यांनी विकास हाच मुद्दा घेऊन प्रचाराचा रोख ठेवला आहे. तर त्यांनी केलेल्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. या मतदारसंघातील जातीय गणीते, काँग्रेसमधील पक्षांतर्गत धुसफुस हे मुद्देही प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- महायुतीकडून या मतदार संघात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली सर्व प्रकारची विकास कामे मतदारांपुढे मांडली जात आहे.
- महाविकास आघाडीकडून राज्यात सत्ता परिवर्तनाची लाट असल्याची बाब मतदारांच्या गळी उतरविली जात आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- महायुतीकडून या मतदार संघात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली सर्व प्रकारची विकास कामे मतदारांपुढे मांडली जात आहे.
- महाविकास आघाडीकडून राज्यात सत्ता परिवर्तनाची लाट असल्याची बाब मतदारांच्या गळी उतरविली जात आहे.
लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसला ३५ हजारांवर मताधिक्य होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सुधीर मुनगगंटीवारांना विकासावर मते देत तिसऱ्यांदा निवडून दिले.
■२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांचा पराभव झाला. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे