विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून पाचवी यादी जाहीर, अखेरच्या क्षणी माढ्यासह या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 12:42 IST2024-10-29T12:32:34+5:302024-10-29T12:42:56+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाख करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्या उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमधून शरद पवार गटाने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे.

विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून पाचवी यादी जाहीर, अखेरच्या क्षणी माढ्यासह या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाख करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्या उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमधून शरद पवार गटाने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीमध्ये अनेक इच्छुकांच्या दावेदारीमुळे तिढा निर्माण झालेल्या माढ्याच्या जागेवर अभिजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज माढा, मुलुंड, मोर्शी, मोहोळ आणि पंढरपूर या एकूण पाच मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या माढ्यामध्ये शरद पवार गटाने अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर मुलुंडमधून संगीता वाजे, मोर्शीमध्ये गिरीश कराळे आणि पंढपूरमधून अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
तसेच उमेदवारीवरून वाद झालेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही शरद पवार गटाने बदलला आहे. मोहोळमध्ये सिद्धी कदम यांना दिलेली उमेदवारी रद्द करत शरद पवार गटाने राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.