राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 06:04 PM2024-11-19T18:04:11+5:302024-11-19T18:55:48+5:30

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ३१ असे महत्त्वाचे उमेदवार आहेत जे स्वत:साठी मतदान करू शकणार नाहीत.

Maharashtra Assembly Election 2024 These 31 Candidates Cannot Vote for Themselves Tomorrow | राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. या मतमोजणीनंतर महाराष्ट्रात कोणाचे सरकार स्थापन होणार आहे कळणार आहे. राज्यात २८८ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ४१३६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यापैकी ३६८ महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारांसह ९.७ कोटी मतदार बुधवारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मात्र असं असले तरी या विधानसभा निवडणुकीत ३१ असे उमेदवार आहेत ज्यांना स्वतःला मतदान करता येणार नाहीये.  प्रत्येक राजकीय पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी असे उमेदवार उभे केले आहेत जे त्या मतदारसंघाचे मतदार नाहीत. प्रत्येक पक्षाने बाहेरच्या उमेदवारांना वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. अशा सर्वपक्षीय ३१ उमेदवारांनी स्थानिक मतदारांकडून मते मागितली आहेत, पण ते स्वत:ला मतदान करू शकणार नाहीत. 

आदित्य ठाकरे हे वांद्रे पूर्व येथील मतदार असून ते वरळी मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांना वरळी मतदारसंघात स्वतःसाठी मतदान करता येणार नाही. तसेच मिलिंद देवरा हे देखील वरळीमधून निवडणूक लढवत असून त्यांनाही स्वतःला मत देता येणार नाही. यासोबत देवेंद्र फडणवीस हे देखील नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असले तरी त्यांना स्वतःसाठी मत देता येणार नाहीये.

उमेदवारमतदारसंघकुठे करणार मतदान
देवेंद्र फडणवीसनागपूर दक्षिण पश्चिमनागपूर पश्चिम
बाळासाहेब थोरातसंगमनेरशिर्डी
आदित्य ठाकरेवरळीवांद्रे पूर्वट
सुधीर मुनगंटीवारबल्लारपूरचंद्रपूर
विजयकुमार गावितनंदुरबारनवापूर
अदिती तटकरेश्रीवर्धनपेण
मिलिंद मुरली देवरावरळीमलबार हिल
रोहित पवारकर्जत जामखेडबारामती
नवाब मलिकमानखूर्द शिवाजीनगरकलिना
हिना विजय गावितअक्कलकुवानंदुरबार
ययाती मनोहर नाईककरंजापुसद
निलेश नारायण राणेकुडाळकणकवली
धीरज देशमुखलातूर ग्रामीणलातूर शहर
झीशान सिद्दिकीवांद्रे पूर्ववांद्रे पश्चिम
इम्तियाज जलीलऔरंगाबाद पूर्वऔरंगाबाद मध्य
संतोष बांगरकळमनुरीहिंगोली
जितेंद्र मोघेअर्णीदिग्रस
अभिजित अडसूळदर्यापूरकांदिवली
मीनल खतगावकरलोहादेगलूर
आशिष देशमुखसावनेरनागपूर पश्चिम
विजय अग्रवालअकोला पश्चिमअकोला पूर्व
सतीश चव्हाणगंगापूरऔरंगाबाद (पश्चिम)
गोपीचंद पडळकरजतखानापूर
अमल ​​महाडिककोल्हापूर दक्षिमहातकणंगले
केदार दिघेकोपरी पाचपाखाडीओवळा माजीवाडा
वैभव नाईककुडाळ कणकवली
विनोद शेलारमालाड पश्चिमकांदिवली पूर्व
शायना एनसी मुनोतमुंबादेवीमलबार हिल
अशोक उईकेराळेगावयवतमाळ
विजयकुमार देशमुखसोलापूर शहर उत्तरसोलापूर शहर मध्य
सुभाष देशमुखसोलापूर दक्षिणसोलापूर शहर मध्य

(माहिती सौजन्यः प्रेमदास राठोड)

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप १४९ जागांवर, शिवसेना ८१ जागांवर, राष्ट्रवादी ५९ जागांवर आणि इतर पक्ष ६ जागांवर निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस १०१ जागांवर, शिवसेना ९५ जागांवर, ८६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ८ जागांवर इतर पक्ष निवडणूक लढवत आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडी २००, मनसे १२५, एमआयएम १७, बहुजन विकास आघाडी आठ जागांवर निवडणूक लढवत आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 These 31 Candidates Cannot Vote for Themselves Tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.