आवाज कुणाचा? 46 ठिकाणी दोन सेना भिडणार, त्यातही बंडोबांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 09:50 AM2024-11-08T09:50:08+5:302024-11-08T09:53:12+5:30
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेनेचे दोन गट यंदा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे असल्याने कुणाचे पारडे जड ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल ४६ ठिकाणी शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असा सामना रंगणार आहे.
- महेश घोराळे
मुंबई : शिवसेनेचे दोन गट यंदा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे असल्याने कुणाचे पारडे जड ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल ४६ ठिकाणी शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असा सामना रंगणार आहे.
या मतदारसंघात सेना विरुद्ध सेना
मराठवाडा
औरंगाबाद मध्य
औरंगाबाद पश्चिम
वैजापूर (छ. संभाजीनगर)
कन्नड (छ. संभाजीनगर)
सिल्लोड (छ. संभाजीनगर)
पैठण (छ. संभाजीनगर)
उस्मानाबाद
उमरगा (धाराशिव)
परभणी
कळमनुरी (हिंगोली)
विदर्भ
रामटेक (नागपूर)
दर्यापूर (अमरावती)
बाळापूर (अकोला)
बुलढाणा
मेहकर (बुलढाणा)
पश्चिम महाराष्ट्र
राधानगरी (कोल्हापूर)
रत्नागिरी
दापोली (रत्नागिरी)
गुहागर (रत्नागिरी)
राजापूर (रत्नागिरी)
पाटण (सातारा)
बार्शी (सोलापूर)
सांगोला (सोलापूर)
उत्तर महाराष्ट्र
मालेगाव बाह्य (जळगाव)
चोपडा (जळगाव)
पाचोरा (जळगाव)
नेवासा
(अहिल्यानगर)
कोकण विभाग : भायखळा (मुंबई), वरळी (मुंबई), चेंबूर (मुंबई), भांडुप पश्चिम (मुंबई), विक्रोळी (मुंबई), कुर्ला (मुंबई), अंधेरी पूर्व (मुंबई), दिंडोशी (मुंबई), जोगेश्वरी पूर्व (मुंबई), मागाठाणे (मुंबई), ठाणे, अंबरनाथ (ठाणे), कल्याण ग्रामीण (ठाणे), भिवंडी ग्रामीण (ठाणे), कल्याण पश्चिम (ठाणे), पालघर, बोईसर (पालघर), कर्जत (रायगड), महाड (रायगड)
४६ पैकी चार जागी बंडखोरी
ज्या ४६ जागांवर सेना विरुद्ध सेना अशी लढत होणार आहे. त्यापैकी औरंगाबाद मध्य आणि कळमनुरी (हिंगोली) या दोन मतदारसंघात उद्धवसेनेचा बंडखोर उमेदवार रिंगणात आहे, तर बुलढाणा आणि बोईसर (पालघर) येथे शिंदेसेनेचा बंडखोर उमेदवार रिंगणात आहे.