"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 08:35 PM2024-09-30T20:35:52+5:302024-09-30T20:36:24+5:30

Maharashtra Assembly Election 2024:

Maharashtra Assembly Election 2024: "Uddhav Thackeray should look in the mirror while criticizing us", says Devendra Fadnavis | "उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला

"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला

रविवारी नागपूरमधील कळमेश्वर येथे झालेल्या सभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता भाजपाकडूनहीउद्धव ठाकरे यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं जात आहे. आमच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी आरसा बघावा, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माननीय उद्धव ठाकरे यांनी आरसा बघावा. कारण काश्मीरमधील ज्या ३७० कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होतं. ते ३७० कलम रद्द करणारे मोदींसोबत अमित शाह आहेत. हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती, ती पुसण्याचा जो प्रयत्न झाला होता. ५०० वर्षांनंतर तो प्रयत्न मोडून टाकणारे आमचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी टीका करताना एकदा आपला चेहरा आकशात पाहून घ्यावा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, काल नागपूरमधील सभेमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राजकारणातून संपवण्याच्या केलेल्या विधानावरूनही उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अमित शाह आम्हाला संपवण्यासाठी येणार आहेत. आम्हाला केवळ जनता संपवू शकते. जनतेनं सांगितलं की, उद्धव ठाकरे घरी बस, तर मी घरी बसेन. मात्र हे मला दिल्लीवरून घरी बसायला सांगत असतील तर जनताच त्यांना घरी बसवेल. हा लढा माझा नाही किंवा शरद पवार यांचा नाही तर आपणा सर्वांचा आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते. तसेच संघाने पोसलेल्या रोपट्याला दाढीवाला डिंक्या आणि गुलाबी अळी लागलीय, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपा, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टोला लगावला होता. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: "Uddhav Thackeray should look in the mirror while criticizing us", says Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.