एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 04:21 PM2024-11-19T16:21:15+5:302024-11-19T16:23:07+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : एवढा पैसा आला कुठून, भाजपनेच नोटबंदी केली होती ना? असा सवाल सुळे यांनी केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : Where did this money come from? Supriya Sule's question on Vinod Tawde's allegations | एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

Maharashtra Assembly Election 2024 :  मुंबई : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप 'बविआ'कडून करण्यात आला आहे. याप्रकरणी विरार येथील एका हॉटेलमध्ये बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला. यावरून आता मतदानाच्या एक दिवस आधीच राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढा पैसा आला कुठून, भाजपनेच नोटबंदी केली होती ना? असा सवाल सुळे यांनी केला आहे.

विनोद तावडे यांच्यावर आरोप होत आहे. यावर माझा विश्वास बसत नाही. मात्र, हे धक्कादायक आहे. मला कधीच असं वाटलं नव्हतं की, भाजपच्या ओरीजनल लोकांकडून अशी कृती घडेल. तसेच, ५ कोटींचं वाटप होतेय. श्रीनिवास पवार यांच्या ऑफिसमध्ये पोलीस येतात, अनिल देशमुखांवर हल्ला होतो, या देशात चाललंय तरी काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

याचबरोबर, ब्लॅक मनीमुळे नोटबंदी भाजपनेच केली होती. मग भाजपकडे हे पाच कोटी रुपये आले कोठून? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच, या गलिच्छ कृतीचा मी निषेध करत भाजपचे सरकार येणार नाही, हे त्यांच्या नेत्यांना समजले असेल असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला. याशिवाय, विनोद तावडेंकडून ही अपेक्षा नव्हती. ते महाराष्ट्रात मंत्री राहिलेत, ते शिक्षणमंत्री होते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

नेमकं काय आहे प्रकरण?
मतदानाच्या आदल्या दिवशीच विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप 'बविआ'ने केला आहे. 'बविआ'चे नेते हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला की, मला भाजपावाल्यांचा फोन आला, तावडे ५ कोटी घेऊन येतायेत, इतका मोठा नेता पैसे का घेऊन येतील, असं मला वाटलं. पण जेव्हा इथं आलो तेव्हा पैसे वाटप सुरू असल्याचं दिसलं. तावडे आल्यापासून इथं सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे हॉटेलवरही कारवाई व्हायला हवी. मला डायरी मिळाली, निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. 

भाजपा नेत्यांनी काय सांगितले?
विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून अशाप्रकारे ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करतायेत हे मुळात हास्यास्पद आहे. कालपासून महाविकास आघाडीने निवडणूक आपल्या हातातून गेली हे त्यांच्या वर्तनातून आणि वागण्यातून दिसून येते. उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीत खोटं नरेटिव्ह सेट करून महाराष्ट्रात यश मिळाले. प्रचार सभा संपेपर्यंत महाविकास आघाडीने सभा, माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे सगळे दावे चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो, असे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Where did this money come from? Supriya Sule's question on Vinod Tawde's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.