'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 02:31 PM2024-11-21T14:31:37+5:302024-11-21T14:32:45+5:30

लोकसभेनंतर पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमनेसामने आले आहेत. त्यातील कोण किती जागा जिंकते यावरून खरी शिवसेना कुणाची हे ठरणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024 - Whose real Shiv Sena will decide 51 Assembly seats; Eknath Shinde will be superior to Uddhav Thackeray? | 'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?

'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?

मुंबई - विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं असून आता सगळ्यांनाच २३ नोव्हेंबरच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. या निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची हे ५१ जागांवरील लढतीत सर्वाधिक जागा कोण जिंकून येते त्यावर ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळवला होता. आता विधानसभा निवडणुकीत शिंदे ठाकरे यांच्यात कोण वरचढ ठरणार हे निकालात स्पष्ट होईल.

कोणत्या ५१ मतदारसंघात दोन सेनेत लढत?

मुंबई विभाग

मागाठाणे - प्रकाश सुर्वे विरुद्ध उदेश पाटेकर 
भांडुप पश्चिम - अशोक पाटील विरुद्ध रमेश कोरगावकर 
जोगेश्वरी पूर्व - मनीषा वायकर विरुद्ध अनंत नर
दिंडोशी - संजय निरुपम विरुद्ध सुनील प्रभू 
चेंबूर - तुकाराम काते विरुद्ध प्रकाश फातर्पेकर
माहीम - सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत
भायखळा - यामिनी जाधव विरुद्ध मनोज जामसुतकर
वरळी - मिलिंद देवरा विरुद्ध आदित्य ठाकरे
विक्रोळी - सुवर्णा कारंजे विरुद्ध सुनील राऊत
कुर्ला - मंगेश कुडाळकर विरुद्ध प्रविणा मोरजकर
अंधेरी पूर्व - मुरजी पटेल विरुद्ध ऋतुजा लटके

कोकण विभाग 

कुडाळ - निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक
रत्नागिरी - उदय सामंत विरुद्ध बाळा माने
राजापूर - किरण सामत विरुद्ध राजन साळवी
सावंतवाडी - दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली
महाड - भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप
दापोली - योगेश कदम विरुद्ध संजय कदम
गुहागर - राजेश बेंडल विरुद्ध भास्कर जाधव
कर्जत - महेंद्र थोरवे विरुद्ध नितीन सावंत
पालघर - राजेंद्र गावित विरुद्ध जयेंद्र दुबळा
अंबरनाथ - बालाजी किणीकर विरुद्ध राजेश वानखेडे
बोईसर - विलास तरे विरुद्ध विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे विरुद्ध महादेव घाटाळ
कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर  विरुद्ध सचिन बासरे 
कल्याण ग्रामीण - राजेश मोरे विरुद्ध सुभाष भोईर
ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक विरुद्ध नरेश मनेरा
कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे

मराठवाडा विभाग

छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे
छत्रपती संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वाल विरुद्ध बाळासाहेब थोरात
परभणी - आनंद भरोसे विरुद्ध राहुल पाटील
सिल्लोड - अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर
पैठण - विलास भुमरे विरुद्ध दत्ता गोर्डे
कन्नड - संजना जाधव विरुद्ध उदयसिंह राजपूत 
वैजापूर - रमेश बोरनारे विरुद्ध दिनेश परदेशी
धाराशिव - अजित पिंगळे विरुद्ध कैलास पाटील
उमरगा - ज्ञानराज चौगुले विरुद्ध प्रवीण स्वामी
कळमनुरी - संतोष बांगर विरुद्ध संतोष टारफे

उत्तर महाराष्ट्र विभाग

चोपडा - चंद्रकांत सोनवणे विरुद्ध प्रभाकर सोनवणे
नांदगाव - सुहास कांदे विरुद्ध गणेश धात्रक
पाचोरा - किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी
मालेगाव बाह्य - दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे

पश्चिम महाराष्ट्र विभाग

बार्शी - राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपल
सांगोला - शहाजी पाटील विरुद्ध दीपक साळुंखे
राधानगरी -प्रकाश आबिटकर विरुद्ध के.पी पाटील
पाटण - शंभुराज देसाई विरुद्ध हर्षल कदम
नेवासा - विठ्ठलराव लंघे विरुद्ध शंकरराव गडाख

विदर्भ विभाग

बुलढाणा - संजय गायकवाड विरुद्ध जयश्री शेळके
मेहकर - संजय रायमूलकर विरुद्ध सिद्धार्थ खरात
बाळापूर - बळीराम शिरसकर विरुद्ध नितीन देशमुख
रामटेक - आशीष जैस्वाल विरुद्ध विशाल बरबटे
दर्यापूर - अभिजीत अडसूळ विरुद्ध गजानन लवटे

दरम्यान, मुंबई, कोकण, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद आहे. त्यात लोकसभेनंतर पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमनेसामने आले आहेत. त्यातील कोण किती जागा जिंकते यावरून खरी शिवसेना कुणाची हे ठरणार आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Whose real Shiv Sena will decide 51 Assembly seats; Eknath Shinde will be superior to Uddhav Thackeray?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.