एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपसोबत का गेले? ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 09:06 PM2024-11-03T21:06:59+5:302024-11-03T21:07:18+5:30
शिवसेनेत गद्दार वि. हिंदुत्व गमावलेले असा वाद आता पुन्हा रंगू लागला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप करत आहेत.
शिवसेनेत गद्दार वि. हिंदुत्व गमावलेले असा वाद आता पुन्हा रंगू लागला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच शिंदे आमदारांना घेऊन पक्ष फोडत भाजपसोबत का गेले याचे कारण ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भर सभेत सांगत खळबळ उडवून दिली आहे.
एकनाथ शिंदेंच्या जवळच्या माणसाला ईडीने पकडले होते. यानंतर भाजपातून शिंदेंवर दाब दिला गेला. कोणी दिला ते तुम्ही ओळखा, मी सांगायची गरज नाही असे म्हणजे निंबाळकर यांनी शिवसेना पक्ष फोडून येतो की जेलात जातो, त्यामुळे जेलात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री झालेले बरे म्हणत शिंदे भाजपसोबत गेल्याचा दावा केला आहे.
कपिल पाटील यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत निंबाळकर बोलत होते. यावेळी त्यांनी कपिल पाटील शिंदेंसोबत गेलेले, जाऊन आला असे सगळे म्हणतात पण खरे तसे नव्हते असे सांगितले. शिंदेंचे आमदार गोटात काय सुरु आहे, याची खबर देण्यासाठी पाटील त्यांच्यासोबत गेलेले. गुजरातच्या बॉर्डरपर्यंत ते मला आणि उद्धव ठाकरेंना फोन करून माहिती देत होते, असाही गौप्यस्फोट निंबाळकर यांनी केला.
अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, सातव्या दिवशी अजित पवार मंत्रिमंडळात आले. या भाजपने महाराष्ट्राचे राजकारण नासविले असल्याचा गंभीर आरोप निंबाळकर यांनी केला आहे.
तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणाची योजना पाटील यांनी आखली आहे. परंतू, गद्दारांसोबत गेले नाहीत म्हणून ती रोखल्याचा आरोपही निंबाळकर यांनी केला आहे.