Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 06:38 PM2024-11-19T18:38:40+5:302024-11-19T18:39:18+5:30

Vinod Tawde, Hitendra Thakur News: सगळ्या राड्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि तावडे एकाच कारमधून का गेले, यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता.

Maharashtra Assembly Election 2024: Why did Vinod Tawde go together in Thakur's car? Hitendra Thakur told all... | Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...

Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...

विनोद तावडेंना नालासोपाऱ्याच्या हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडल्यानंतर बविआच्या नेते, कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. भाजपाचा राष्ट्रीय स्तरावरील नेता पैसे वाटत असल्यावर माझा विश्वास बसला नाही असे बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. तसेच या सगळ्या राड्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि तावडे एकाच कारमधून का गेले, यावरही त्यांनी खुलासा केला. 

तावडे निघाले होते. तेव्हा तावडेंची गाडी बरोबर नाही. विनोद तावडेंना तुमच्यासोबत घेऊन निघा असे पोलिसांनी सांगितले. यामुळे तावडेंना सुरक्षित घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावरच आली, असे ठाकूर म्हणाले. 

कधी कोण काय करेल, नाही करेल. म्हणून मी तावडेंना माझ्यासोबत घेतले आणि पुढे जाऊन त्यांना दुसरी गाडी देऊन पाठवून दिले. लोक भडकलेले होते. माझी राडा संस्कृती नाही. तावडेंना सेफ बाहेर काढले. माझ्या अपरोक्ष काहीही घडले नाही, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. मला १९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा ती रक्कम मोजली जात होती, असेही ठाकूर म्हणाले. 

बविआ हा भाजपाचा मित्रपक्ष आहे. इथे सर्व्हे शून्य आहे, असे भाजपाला माहिती आहे. मला भाजपाच्याच नेत्याचा फोन आला की तावडे ५ कोटी रुपये घेऊन वाटण्यासाठी येत आहेत. मी त्यांना म्हटले एवढा मोठा नेता असे करणार नाही. परंतू, तावडे आले, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. या मिटींगला २०० लोक जमले होते, त्याना त्या पैशांचे वाटप झाले असेल आणि ते निघून गेले असतील असे ठाकूर म्हणाले. पत्रकार परिषदेनंतर तावडे आणि ठाकूर हे दोघेही एकाच कारमधून निघून गेले. यामुळे या प्रकरणावर एकंदरीतच जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Why did Vinod Tawde go together in Thakur's car? Hitendra Thakur told all...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.