Maharashtra Assembly election : शरद पवारांनी घेरताच हसन मुश्रीफांचा 'भुजबळ पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 06:43 PM2024-09-04T18:43:55+5:302024-09-04T18:44:41+5:30

भाजपच्या समरजीतसिंह घाटगे यांना गळाला लावत शरद पवारांनी कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफांविरोधात आव्हान उभे केले आहे. शरद पवारांनी कागलमध्ये लक्ष घातल्याने ही निवडणूक मुश्रीफांना जड जाईल अशी चर्चा आहे. त्यानंतर मुश्रीफांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा होत आहे. 

Maharashtra Assembly election: Hasan Mushrif's 'Bhujbal pattern' as Sharad Pawar surrounds him | Maharashtra Assembly election : शरद पवारांनी घेरताच हसन मुश्रीफांचा 'भुजबळ पॅटर्न'

Maharashtra Assembly election : शरद पवारांनी घेरताच हसन मुश्रीफांचा 'भुजबळ पॅटर्न'

Sharad Pawar Hasan Mushrif : अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनेक नेते शरद पवारांना सोडून गेले. पवारांनी एकनिष्ठ असलेले आणि जे सोडून जाणार नाही, असे वाटत होते, तेही अजित पवारांसोबत जात सत्तेत सामील झाले. अशाच नेत्यांविरोधात शरद पवार आता रणनीती आखताना दिसत आहे. कागलमधून शरद पवारांनी सुरूवात केली असून, भुजबळांविरोधातही भाजपमधील एका व्यक्तीला उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. पण, भुजबळांनी कागलमध्ये लक्ष घातल्याने हसन मुश्रीफांनी एक विधान केले. भुजबळांनी पवारांना लक्ष्य करण्यासाठी जे शस्त्र वापरले होते, तेच मुश्रीफांनीही वापरले आहे. 

कागल विधानसभा मतदारसंघातून तयारी करत असलेल्या समरजीतसिंह घाटगे यांना शरद पवारांनी गळाला लावत भाजपला धक्का दिलाच, पण हसन मुश्रीफांचेही टेन्शन वाढवले आहे. समरजीतसिंह घाटगेंच्या प्रवेशामुळे हसन मुश्रीफांना निवडणूक जड जाऊ शकते, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. 

हसन मुश्रीफांचा भुजबळ पॅटर्न काय?

एकेकाळचे जवळचे सहकारी असलेल्या हसन मुश्रीफांविरोधात शरद पवारांनी पहिली चाल चालली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ बॅकफूटवर गेल्याचे बोलले जात आहे. शरद पवारांवर टीका करण्याचा फटका बसू शकतो, हे लक्षात येताच मुश्रीफांनी भुजबळांप्रमाणेच जातीचे कार्ड खेळले आहे. 

"पवार साहेब माझे दैवत आहे. पवार साहेब माझ्या मागे का लागले आहे, हे मला कळत नाही. ते माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागत आहेत?", असे मुश्रीफ म्हणाले. शरद पवारांना थेट आव्हान देणे आगामी विधानसभा निवडणुकीत धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे मुश्रीफांनी भुजबळांप्रमाणे खेळी केल्याचे बोलले जात आहे. 

छगन भुजबळ काय बोलले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी येवल्यामध्ये सभा घेतली होती. "मी माफी मागण्यासाठी आलो आहे. मी मतदारांची माफी मागायला आलोय. माफी मागतोय कारण माझा अंदाज चुकला", असे पवार येवल्यातील सभेत म्हणाले होते. पवारांनी घेरल्याने भुजबळांनी टीका करण्याचे टाळले होते. "मी ओबीसी आहे म्हणून शरद पवारांनी सर्वात आधी माझ्या मतदारसंघात सभा घेतली", असे म्हणत भुजबळांनी पवारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. 

Web Title: Maharashtra Assembly election: Hasan Mushrif's 'Bhujbal pattern' as Sharad Pawar surrounds him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.