Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या फेरीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर; भाजपा उमेदवाराची आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:33 AM2024-11-23T09:33:58+5:302024-11-23T09:41:14+5:30
पाटण मतदारसंघात शंभुराज देसाई आघाडीवर आहेत. वाई मतदारसंघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील आघाडीवर आहेत.
सातारा - विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ पासून सुरूवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. महायुतीला १५० हून अधिक जागा मिळताना दिसत आहे तर महाविकास आघाडीला १२० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पहिल्या फेरीत पिछाडीवर आहेत.
कराड दक्षिण मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अतुल भोसले १५९० मतांची आघाडी घेतली आहे. तर साताऱ्यातील जावळी मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ४३१४ मते तर ठाकरे गटाचे अमित कदम १०६२ मतांनी आघाडीवर आहेत. पाटण मतदारसंघात शंभुराज देसाई आघाडीवर आहेत. वाई मतदारसंघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील आघाडीवर आहेत. त्यांना ६२९४ मते मिळाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अरुणादेवी मिसाळ यांना ५०९२ मते मिळाली आहेत.
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!