असाही प्रताप! जरांगेंनी तिकीट द्यावे म्हणून उमेदवाराने स्वत:चेच वाहन जाळले; असे बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 07:23 PM2024-11-03T19:23:26+5:302024-11-03T19:25:10+5:30

Manoj Jarange News: अपक्ष उमेदवार परसराम कदम यांच्यावर डिझेल टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न आणि गाडी जाळल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शाम वडजे यांनी पोलिसांना फोनद्वारे कळविले होते.

Maharashtra Assembly Election vidhan sabha Big news! A candidate burnt his own vehicle to get Manoj Jarange attention to give the ticket; attempt to make fool | असाही प्रताप! जरांगेंनी तिकीट द्यावे म्हणून उमेदवाराने स्वत:चेच वाहन जाळले; असे बिंग फुटले

असाही प्रताप! जरांगेंनी तिकीट द्यावे म्हणून उमेदवाराने स्वत:चेच वाहन जाळले; असे बिंग फुटले

नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे समर्थक उमेदवाराने स्वत:च्याच गा़डीवर डिझेल टाकत ती विरोधकांनी जाळल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठीच आपण हा प्रकार केल्याचे पोलीस चौकशीत त्यांनी कबुल केले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

शनिवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. एफआयआरनुसार सेवादास नगर तांडा जवळ, मुखेड ते चाहाणी रोडवर अपक्ष उमेदवार परसराम कदम यांच्यावर डिझेल टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न आणि गाडी जाळल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शाम वडजे यांनी पोलिसांना फोनद्वारे कळविले होते. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन गाडी बोलवत आग विझविली होती. यानंतर परसराम कदम आणि त्यांचा पुतण्या अक्षय कदम याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. 

यावेळी कदम यांनी ही गाडी काकाची असल्याचे सांगत उमेदवार कोण आहे अशी विचारणा हल्लेखोरांनी केल्याचा दावा केला होता. तसेच माझ्या अंगावर डिझेल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, परंतू आम्ही पळून गेलो असे सांगत बनाव रचला होता. प्रत्यक्षदर्शींनी मात्र गाडीत आणखी दोन महिला होत्या हे पाहिल्याचे पोलिसांना सांगितले होते. यामुळे पोलिसांना संशय आला होता. 

कदम काका-पुतण्याची चौकशी केली असता त्यांनी आपली गाडी कोणी जाळलेली नाही, मनोज जरांगे सहानुभूतीपोटी आपल्याला तिकीट देतील व प्रसिद्धी होईल या उद्देशाने आम्हीच गाडी जाळल्याचे त्यांनी कबुल केले. यानुसार खोटी माहिती देणे, सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवितास धोका आणि वाहनांस धोका निर्माण होईल असे कृत्य करणे याविरोधात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election vidhan sabha Big news! A candidate burnt his own vehicle to get Manoj Jarange attention to give the ticket; attempt to make fool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.