"सभागृहातील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटाला जनतेचा पैसा वाया जात असून सर्वपक्षीय नेत्यांना याचे गांभीर्य हवे"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 06:49 AM2022-02-21T06:49:45+5:302022-02-21T06:50:05+5:30
नरहरी झिरवळ यांनी मांडलं परखड मत.
कल्याण : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मान्य आहे. पण याउपरही विधिमंडळ सभागृहातील सदस्यांचे गैरवर्तन असेच सुरू राहिले तर सभागृहाचे सर्व अधिकार संपुष्टात येतील. गैरवर्तनाबाबत सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहोत. यंदा फक्त सहा दिवस अधिवेशन चालले. त्यातही एखादा विधायक प्रश्न उपस्थित झाला तर मागचे काही तरी उकरून वेळ वाया घालविला. सभागृहातील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटाला जनतेचा पैसा वाया जात असून सर्वपक्षीय नेत्यांना याचे गांभीर्य असले पाहिजे, असे नरहरी झिरवळ म्हणाले.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात विकासकामांवर बोलताना एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण त्याचे श्रेय घेऊन आमच्या प्रेरणेने मुलगा झाल्याचे म्हणतात, असा टोला लगावला होता. त्यावर फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असे काहीतरी बोलावे हे अपेक्षित नाही, असे प्रत्युत्तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डोंबिवलीतील गोळवली येथील कार्यक्रमात दिले.
- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोळवलीतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आव्हाड आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात आले.
- त्यावेळी आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. श्रेयाची लढाई ठाण्यात आहे, असे मला कधी दिसले नाही. राजकारणात कार्यकर्त्यांचा हुरूप वाढविण्यासाठी असे बोलावे लागते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.