अमित ठाकरेंचा प्रचार करण्याचे वक्तव्य; प्रसाद लाड यांना सरवणकर पूत्राने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 06:57 PM2024-11-03T18:57:13+5:302024-11-03T18:57:43+5:30

Amit thackeray vs Sada Sarvankar: भाजपाच्या ठाकरेंना पाठिंब्याच्या भूमिकेनंतर आता मोदींची सभा कोणासाठी होणार याचाही प्रश्न विचारला जात आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 Amit Thackeray's campaign statement; Prasad Lad was narrated by sada Saravankar son | अमित ठाकरेंचा प्रचार करण्याचे वक्तव्य; प्रसाद लाड यांना सरवणकर पूत्राने सुनावले

अमित ठाकरेंचा प्रचार करण्याचे वक्तव्य; प्रसाद लाड यांना सरवणकर पूत्राने सुनावले

माहिम मतदारसंघ महायुतीत मोठा खेळ करण्याची चिन्हे आहेत. भाजपचे नेते सतत अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत बोलत आहेत. आज तर प्रसाद लाड यांनी भाजपाअमित ठाकरेंचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरून एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपात जुंपली आहे. प्रसाद लाड यांना उमेदवार सदा सरवणकर यांचे पूत्र समाधान यांनी ट्विट करून प्रत्यूत्तर दिले आहे. 

सरवणकर माघार घेतील असे वाटते, मात्र भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करू, असे भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. यावर सरवणकर यांनी प्रसाद लाड साहेब, जो माणूस जनतेमध्ये काम करतो आणि जनता ज्याला निवडून आणते त्याला विधानपरिषदेची लालच नसते. दादरमध्ये शिवसेना भाजप युतीचा धनुष्यबाणाचा उमेदवार नसणं हे किती शरमेची बाब होईल हे समजण्यासाठी शिवसैनिक असणे गरजेचे असते. महाराष्ट्रामध्ये काय चित्र जाईल, ज्या ठिकाणी शिवसेनेचा जन्म झाला त्या विधानसभेमध्ये धनुष्यबाण नाही, असे ट्विट करत प्रत्यूत्तर दिले आहे. 

भाजपाच्या ठाकरेंना पाठिंब्याच्या भूमिकेनंतर आता मोदींची सभा कोणासाठी होणार याचाही प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. यापैकी एक सभा ही मुंबईत होणार आहे. मोदी शिवाजीपार्कवर महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. अशातच मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पाडणाऱ्या माहिम मतदारसंघातच मोदींची सभा होत आहे. यामुळे मोदी माहिममध्ये सदा सरवणकरांसाठी प्रचार करणार की राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेंसाठी असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 Amit Thackeray's campaign statement; Prasad Lad was narrated by sada Saravankar son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.