“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 09:22 PM2024-11-22T21:22:35+5:302024-11-22T21:25:41+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ४१ वर्षे भाजपाचे काम केले. पक्षाला गावागावांत नेले. संघटना मजबूत केली. ऐनवेळी मला निवडणुकीतून माघार घ्यायला सांगितली आणि चुकीचे आरोप केले, अशी नाराजी या नेत्याने व्यक्त केली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 big blow to bjp before results arvi mla dadarao keche declared retirement from politics | “४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास

“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी काऊंट डाऊन सुरू झाला असताना भाजपाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. एका बड्या नेत्याने थेट राजकीय संन्यास जाहीर केला आहे. 

कारण नसताना वेगवेगळे चुकीचे आरोप करण्यात आले. पक्षाने तिकीट दिले होते. परंतु मागे घेण्यास सांगितले. पक्षाचा आदेश मान्य करत मागे घेतले. ४ तारखेला पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून फॉर्म मागे घेतला. त्यानंतर नाराज नव्हतो. भाजपा उमेदवारासाठी २७ सभा घेतल्या. अनेक मेळावे घेतले. परंतु, मतदारसंघात मी काम केले नाही, असे चुकीचे आरोप केले जात आहे. कामे केली नसती तर निवडून येऊ शकलो नसतो, काम केले नसती तर मेळावे कशाला घेतले असते. आताही गावागावांत माझा कार्यकर्ता आहे. माझ्यावर होत असलेले आरोप पाहून वाटते, अर्ज मागे नसता घेतला, उभाच राहलो असतो तर बरे झाले असते, अशी नाराजी दादाराव केचे यांनी बोलून दाखवली. दादाराव केचे आर्वी येथून भाजपाचे विद्यमान आमदार आहेत.

विधान परिषदेचा शब्द दिला असला, तरी त्याचा भरवसा नाही

आता राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे काम करणार नाही, कोणत्याही पक्षात जाणार नाही. आता समाजकार्य करणार आहे. १९८३ पासून भाजपाचे काम केले. पक्षाला गावागावांत नेले. संघटना मजबूत केली. २००९ मध्ये आमदार झालो. त्यानंतर २०१४ मध्ये पराभव झाला. परंतु पुन्हा २०१९ मध्ये निवडून आलो. विधासभेचे तिकीट मागे घेण्यास सांगितले तेव्हा विधान परिषद कबूल केली होती. पण काय भरवसा आहे. गेली जवळपास ४१ वर्षे मतदारसंघात कामे केली. आता माझे वय ७१ वर्ष झाले. आता थांबण्याचा निर्णय घेतला, असे दादाराव केचे यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 big blow to bjp before results arvi mla dadarao keche declared retirement from politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.