“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 22:36 IST2024-11-19T22:35:41+5:302024-11-19T22:36:33+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: चुकून भाजपाचा विजय झाला तर विनोद तावडेंना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नालासोपारा विरार भागात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर येथे आले. सगळी परिस्थिती आटोक्यात आणत विनोद तावडे, भाजपा उमेदवार राजन नाईक आणि सहकाऱ्यांना तब्बल चार तासांनंतर सहीसलामत आपल्याच कारमधून हितेंद्र ठाकूर यांनी बाहेर सोडले. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
राज्यभर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून वारेमाप पैसा वापरला जात आहे. कराड दक्षिणेत दोन दिवसापूर्वी पैसै वाटताना एकाला पकडले आहे. सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मोदी -शाह यांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरु आहे, असा आरोप करत निवडणुकीनंतर भाजपा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर खापर फोडले जाईल. चुकून भाजपाचा विजय झाला तर विनोद तावडेंना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न असू शकतो. भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनोज जरांगेनी मला शुभेच्छा दिल्या असून मला श्रेयवादात, राजकारणात पडायचे नाही. मनोज जरांगे यांचा फोन आला होता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.