विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:07 PM2024-11-19T17:07:16+5:302024-11-19T17:07:45+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नालासोपारा-विरार येथे घडलेल्या प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 election commission first reaction over bahujan vikas aghadi allegations money distribution on bjp vinod tawde | विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विरारमधील हॉटेल विवांतामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आले होते, असा मोठा आरोप बविआने केला. तर या हॉटेलमधून १० लाखांची रोख मिळाली आहे. तसेच अनेक डायऱ्या मिळाल्या आहेत, ज्यात व्यवहाराच्या नोंदी सापडल्याचा दावा स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. तब्बल चार तासांनी विनोद तावडे, राजन नाईक, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर एकाच कारमधून बसून बाहेर पडले. 

विनोद तावडे ५ कोटी घेऊन येत आहेत, हे भाजपावाल्यांनीच मला सांगितले. मला वाटले की, विनोद तावडे राजकीय नेते आहे, हे असे छोटे काम करणार नाही. मात्र आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले तेव्हा ते हॉटेलमध्ये पैसे वाटत होते. हॉटेलमधील सीसीटीव्ही बंद होता. आम्ही आल्यावर सीसीटीव्ही सुरु केला. हॉटेल मालकांनी असे का केले, हे त्यांनाच विचारा. हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला पाहिजे. विनोद तावडे मला सारखे फोन करत होते. मला सोडवा, माझी चूक झाली, मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत होते. विनोद तावडे यांनी मला २५ फोन केले, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यात आली. 

निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

नालासोपाऱ्यातील घटनेची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा आणि आमची निवडणूक यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ज्या स्पॉटवर ही घटना घडली, तिथे आमचे पथक पोहोचले. तेथील परिसर आणि हॉटेलची पाहाणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे. पोलीस यंत्रणेची प्राथमिकता ही कायदा आणि सुव्यवस्था राखणे आहे. निवडणुकीसंदर्भातील कायद्यांचे काटेकोरपणे पालन होतय का? यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे. आचारसंहितेच्या नियमानुसार सायलेंड पिरियडमध्ये उमेदवाराला त्याचा मतदारसंघ सोडून प्रचारासाठी दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघात जाता येत नाही. कारण प्रचाराला बंदी असते. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीचे ४८ तास हे सायलेंड पिरियड असतात. त्या काळात प्रचाराला बंदी असते. त्यामुळे या काळात दुसऱ्या मतदारसंघात जाऊन प्रचार करणे अपेक्षित नसते, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप बविआचे आमदार, उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तावडे यांच्यासह भाजपा उमेदवार राजन नाईक यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 election commission first reaction over bahujan vikas aghadi allegations money distribution on bjp vinod tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.