५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 02:32 PM2024-10-28T14:32:49+5:302024-10-28T14:33:12+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ही परिवर्तनाची निवडणूक आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp mp nilesh lanke slams bjp radha krishna vikhe patil and sujay vikhe patil | ५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार

५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: स्वाभीमानीचा लढा लढू या. दहशतीला गाडूया, कायमचे गाडूया. गणेश सहकारी साखर कारखान्यातून याचा श्रीगणेशा झाला आहे. जगन्नाथाचा रथ अविरत पुढे चालला आहे. त्या रथाच्या चालक प्रभावती घोगरे आहेत. विधिमंडळात ही वाघीण गरजणार आहे. एक वर्षापासूनच जीभ घसरायला सुरू झाली. काही कार्यकर्ते भेटले आणि सांगितले की, आम्ही विखेंचे कार्यकर्ते, पण आता त्यांची जिरवा. इतिहास बदलणारे आम्ही आहोत, जनतेन ठरवले तर बदल घडतो, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि सुजय विखे-पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. 

महाविकास आघाडीच्या एका मेळाव्यात बोलताना निलेश लंके यांनी विखेंवर निशाणा साधला. म्हणे आम्ही सुसंस्कृत आहोत. बाळासाहेब थोरात राज्यातील सुसंस्कृत नेते आहे. पण, यांचे विचारच घाणरडे आहेत, कसला टायगर... कसला वाघ... मांजरीने वाघाचे झुल अंगावर पांघरल्याने तो वाघ होत नाही. घाबरू नका, अभी नहीं तो कभी नहीं. आम्हाला उलटे पाढे मोजता येतात. आमच्यावर थोरात आणि पवार यांचे संस्कार आहेत, असे म्हणत निलेश लंके यांनी टीकास्त्र सोडले.

५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे

ही परिवर्तनाची निवडणूक आहे. महाविकास आघाडीचे चिन्ह घराघरात पोहोचवा. शिर्डी मतदारसंघात प्रभावती घोगरे ५० हजार मतांनी विजयी होणार आहेत. ५० वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागला, हे २३ तारखेला सर्वांना समजले पाहिजे.  बारकाईने सर्व लक्ष द्यावे लागेल, घाबरायचे नाही. मला इंग्रजी जरा कमी येते, पण मी इंग्रजीतून शपथ घेतली अन् ती गाजली, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, संगमनेर मतदारसंघात घडलेल्या प्रकारावरून राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. जयश्री थोरात यांच्याबद्दल विखे पाटील यांच्या समर्थक वसंतराव देशमुख यांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  यावर, तुम्ही मर्द होतात तर पळून कशाला गेलात?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp mp nilesh lanke slams bjp radha krishna vikhe patil and sujay vikhe patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.