महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 12:56 PM2024-11-01T12:56:19+5:302024-11-01T12:57:11+5:30

Mahayuti rebels in Maharashtra: दोन्ही युती, आघाडी यांच्या जागा आता तीन-तीन पक्षांत वाटाव्या लागल्या आहेत. यामुळे इच्छुकांची संख्याही वाढलेली आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: number of rebels in the Grand Alliance is 36, out of which 19 are from the BJP; If the rebellion is quelled, the mahayuti-mahaAghadi will lose 50 seats | महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका

महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका

यापूर्वी चार पक्ष आणि त्यांच्या दोन आघाड्या असे मतदारसंघ वाटपाचे असलेले गणित यंदा सहा पक्ष आणि दोन आघाड्या असे झाले आहे. दोन्ही युती, आघाडी यांच्या जागा आता तीन-तीन पक्षांत वाटाव्या लागल्या आहेत. यामुळे इच्छुकांची संख्याही वाढलेली आहे. एकट्या महायुतीतच एक दोन नाही तर जवळपास ३६ जणांनी बंडखोरी केलेली आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत ही बाब वेगळीच आहे. परंतू, नाराजांनी देखील मोठ्या प्रमाणावर बंड केल्याने हे बंड शमविण्याचे काम आता वरिष्ठांना करावे लागत आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला जेमतेम १७-१८ दिवस राहिले आहेत. त्यात दिवाळीचा सण आला आहे. यामुळे प्रचारात अडथळे येत आहेत. अशातच येत्या तीन दिवसांत बंडोबांचे बंड थंड करावे लागणार आहे. जर या बंडोबांचे बंड कायम राहिले तर राज्यातील ५० जागांवरील निकाल फिरण्याची शक्यता आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. 

एकट्या महायुतीतच ३६ बंडखोर उभे ठाकले आहेत. भाजपाने साम दाम दंड भेद वापरून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या काही नेत्यांना थंड केले आहे.  परंतू, सर्वाधिक बंडखोर हे भाजपाचेच असल्याने आता शिंदे आणि अजित पवार गटही आक्रमक होत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोरांनी १६ जागांवर आव्हान उभे केले आहे. अजित पवारांच्या पक्षाचा एकच बंडखोर आहे. 

याच्या उलट परिस्थिती मविआमध्ये आहे. मविआत १४ जागांवरच बंडखोर उभे राहिले आहेत. यात काँग्रेस आघाडीवर आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाविरोधात काँग्रेसच्या १० जणांनी बंडखोरी केलेली आहे. चार जागांवर उद्धव ठाकरेंच्या बंडखोरांनी काँग्रेसविरोधात उमेदवारी दिली आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: number of rebels in the Grand Alliance is 36, out of which 19 are from the BJP; If the rebellion is quelled, the mahayuti-mahaAghadi will lose 50 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.